Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाच आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

28 Jun 2024, 14:34 वाजता

Maharashtra Budget 2024 : 'शेतकऱ्यांना मोफत वीजेसाठी सौरऊर्जा पंप देणार'

शेतकऱ्यांना मोफत वीजेसाठी सौरऊर्जा पंप मोफत देण्यात येणार आहे. मागेल त्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाईल. 

28 Jun 2024, 14:30 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय?
पडीक जमिनींवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या मृत कुटुंबाला निधीची मदत करणार आहे. ही रक्कम 20 लाखांवरुन 25 लाखांवर करण्यात आला आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत. 

 

28 Jun 2024, 14:27 वाजता

Maharashtra Budget 2024 : मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करणार

विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना राबवण्यात येणार आहे. मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ केलं जाणार आहे. 25 लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. 

 

28 Jun 2024, 14:26 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना

राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार आहोत. 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे. 

 

28 Jun 2024, 14:26 वाजता

Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

तर कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना 5 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. गायीच्या दूधाला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान देणार आहोत. 

 

28 Jun 2024, 14:22 वाजता

Maharashtra Budget 2024 : मुलींना सक्षम करणार - अजित पवार

मुलींना व्यावसयायिक कोर्सेससाठी शुक्ल सवलत देण्यात येणार आहे. गाव तिथे गोदाम ही योजना राबविण्यात येणार आहे. 

 

28 Jun 2024, 14:19 वाजता

Maharashtra Budget 2024 : हर घर नल, हर घर जलसाठी निधी जाहीर 

जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. हर घर नल, हर घर जलसाठी 1 कोटी 25 लाख 66 लाख घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. 

 

28 Jun 2024, 14:17 वाजता

Maharashtra Budget 2024 : महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना 

महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर करण्यात आली होती. त्यात वेळोवेळी बदल केले गेले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर करण्यात आली आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार आहोत. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

 

28 Jun 2024, 14:17 वाजता

Maharashtra Budget 2024 : शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10 हजार होते ते आता 25 हजार करण्यात आलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करुन देणार आहोत. 

 

28 Jun 2024, 14:14 वाजता

Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना लागू करणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महा 1500 रुपये देणार, असं अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी देण्यात येणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.