Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Budget 2024 : अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाच आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

28 Jun 2024, 12:06 वाजता

Today Breaking News LIVE Updates: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर, जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन

28 Jun 2024, 12:04 वाजता

Today Breaking News LIVE Updates: अमोल मिटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, सुरेश धस यांची टीका

पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला हे आमचा पक्ष पाहून घेईल. आम्ही त्याबाबत आढावा घेऊन पक्षाला देऊ. पंकजा मुंडे यांना सांगू. अमोल मीटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, अशा शब्दात सुरेश धस यांनी टीका केली. 

कुणीही चुटूर फुटुर येणार आणि आम्हाला बोलणार असं चालणार नाही. महायुतीत तिसरा भिडू आल्यामुळेच आम्हाला मोठा फटका बसला. शिवसेना -भाजपा ही नैसर्गिक युती आहे. परंतु या युतीत तिसरा भिडू आल्याने लोकांमध्ये देखील नाराजीचे भावना होती, असेही सुरेश धस यांनी म्हटले. 

28 Jun 2024, 11:19 वाजता

Today Breaking News LIVE Updates: अजितदादांच्या क्लीनचिटला ईडीचा विरोध

शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोन्ही सरकारी तपास यंत्रणा आमने सामने आल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जवाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आणि हा गैरव्यवहार झाला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार संचालक होते. त्यामुळे जवळपास 70 जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. मात्र कर्जवाटप करतेवेळी कुठलीही अनियमितता झालेली नाही. असा दावा करीत हे प्रकरण बंद करण्याचा शिफारस अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केलाय. आणि त्यावर आक्षेप घेत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर 12 जुलै ला सुनावणी होणारेय. 

28 Jun 2024, 11:19 वाजता

Today Breaking News LIVE Updates: पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने शाळेच्या मुलांना चिरडलंय

पालघरमध्ये भरधाव ट्रेलरने शाळेच्या मुलांना चिरडलंय.. या दुर्घटनेत एका आठवीच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय.. तर दोघं गंभीर जखमी झालेत... मुलं सकाळी शालेत जात असताना ओव्हरटेक करणा-या ट्रेरलनं या मुलांना चिरडलं.. पालघरच्या चिल्हार-बोईसर मार्गावर ही दुर्घटना घडली.. अपघातानंतर ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी विद्यार्थ्यांवर  अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

28 Jun 2024, 11:18 वाजता

Today Breaking News LIVE Updates: दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, कोल्हार घोटी राजमार्गावर रस्ता रोको सुरू..
- संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको सुरू..
- शिवआर्मी दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं रास्ता रोकोचे आयोजन..
- दुग्धविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी आक्रमक..
- शेकडोंच्या संख्येने शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सहभागी..

28 Jun 2024, 11:17 वाजता

Today Breaking News LIVE Updates: विधान परिषदेसाठी मविआ तीन उमेदवार निश्चित

विधान परिषदेसाठी मविआ तीन उमेदवार देणारे हे जवळपास निश्चित झालंय...विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव चर्चेत
आहे...तर मविआचे उमेदवार म्हणून शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढणार आहेत...त्यांना तिन्ही पक्ष मदत करणार आहेत...तर काँग्रेस अल्पसंख्याक समाजातील उमेदवार देणार आहे...लोकसभेला एकही उमेदवार मुस्लीम समाजातील दिला गेला नव्हता...त्यामुळे आता संधी मिळणार आहे...महाविकास आघाडीचे संख्या बळ हे सध्या 62 आहे... तीन जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला 69 मतांची गरज आहे...एक जागा निवडून येण्यासाठी 23 मतांची गरज आहे...मविआला सातहून अधिक मतांची गरज लागू शकते...

28 Jun 2024, 11:15 वाजता

Today Breaking News LIVE Updates: एक अकेला मोदी सब पे भारी, 'गिरे तो भी टांग उपर'

विधानभवनाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांनी घोषणाबाजी केलीय...एक अकेला मोदी सब पे भारी, 'गिरे तो भी टांग उपर' अशी सत्ताधा-यांकडून पोस्टरबाजी करण्यात आलीय...लोकसभा निवडणुकीवरून ही पोस्टरबाजी सत्ताधा-यांकडून करण्यात आली...यावेळी विरोधकांना डिवचण्यासाठी घोषणाबाजी देण्यात आली...

28 Jun 2024, 11:14 वाजता

Today Breaking News LIVE Updates: विरोधकांचं विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन 

अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन सुरु केलंय.. केंद्र सरकारच्या दूध भुकटी आयातीच्या निर्णयाचा विरोधकांनी निषेध केलाय. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप विरोधकांनी केलाय. विरोधकांनी शेतक-यांच्या कर्जमाफीचीही मागणी केलीये.

28 Jun 2024, 10:29 वाजता

Today Breaking News LIVE Updates: दगडफेकीच्या घटनेनंतर गावातील तणाव निवळलाय

मातोरी गावामध्ये दगडफेकीच्या घटनेनंतर गावातील तणाव निवळलाय. काल ओबीसी रॅलीवर दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. मात्र लक्ष्मण हाकेंनी तरुणांना शांततेचं आवाहन केलं. तसंच गावात पोलीसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. प्रशासनाकडून शांततेचं अहवान करण्यात आलंय. त्यानंतर गावातील तणाव निवळलाय.

28 Jun 2024, 10:28 वाजता

Today Breaking News LIVE Updates: महायुतीचे नेते आणि प्रवक्त्यांमध्ये जुंपल्याची...

भाजप नेत्यांनी आमची लायकी, औकाद काढण्यापेक्षा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला याचं धस यांनी उत्तर द्यावं...असा सवाल अमोल मिटकरींनी धस यांना विचारलाय...महायुतीत तिसरा भिडू घेतल्यानं लोकसभेला हरलो, अशा शब्दांत भाजप नेते सुरेश धस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला...अजित पवारांना सोबत घेतलं हे लोकांना आवडलं नाही, असं ते म्हणाले...त्यावर आता अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय...