Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 06 MAY महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Add Zee News as a Preferred Source
06 May 2026 10:51 PM (IST)

पुण्यातील पर्वती अत्याचार प्रकरण, आरोपीला 8 मेपर्यंत पोलीस कोठडी

 

Pune Parvati Atrocity Case : नसरापूर प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळलली असताना पुण्यातून आणखी एक चीड आणणारी घटना समोर आलीये..  पुण्याच्या पर्वती परिसरातील दत्तवाडीत एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय... धक्कादायक म्हणजे मुलीच्या आजोबानेच हा अत्याचाराचा प्रयत्न केलाय..एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आलीये.. पर्वती अत्याचार प्रकरणातील नराधमाची पोलीस कोठडीत रवानगी.. नातीवर हात टाकणा-या आजोबाला 8 मेपर्यंत कोठडी.. तर एका बाईने अफवा उठवली म्हणून मला अटक केली, कोर्टाच्या विचारणेनंतर आरोपीचं उत्तर.

06 May 2026 10:34 PM (IST)

राज्यातील महिला अत्याचार प्रकरण, खासदार वर्षा गायकवाडांचं राज्यपालांना पत्र

 

Varsha Gaikwad : राज्यातील महिला अत्याचार प्ररणी खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यपालांना पत्र देत शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केलीय...नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे.. असं पत्र वर्षा गायकवाडांनी दिलंय.

06 May 2026 08:31 PM (IST)

सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा

 

Sunetra Pawar Resign : सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा आता सुरू झालीय.. रिक्त जागेवर जय पवार, छगन भुजबळ, समीर भुजबळ, आनंद परांजपेंच्या नावाची चर्चा.. कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष?

06 May 2026 04:33 PM (IST)

सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार

 

Sunetra Pawar to Resign : सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला. त्यानंतर दोन दिवसांतच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. मात्र, एकाच वेळी विधानसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व ठेवता येत नसल्याने त्या आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारेत. दिल्ली दौऱ्यात त्या राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण करणारेत. हा राजीनामा दिल्यास त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेचा मार्ग अधिक स्पष्ट होईल.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

06 May 2026 04:03 PM (IST)

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचारी हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती 

 

Uday Samant on Hindi Sakti : हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देण्यात आलीये...मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली...त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा होणार नाहीये..दरम्यान 1976च्या नियमावली नुसार दरवर्षी परीक्षा घेतली जात होती...मात्र आता या परिक्षेची आवश्यकता आहे का हे तपासावं लागणार असल्याचं मंत्री सामंत म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

06 May 2026 01:32 PM (IST)

नागपुरात पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा

NAGPUR : नागपुरात पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झालायं... इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय... तर  काही पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी सेवा सुरळीत सुरूये...  इंधन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे...

06 May 2026 01:17 PM (IST)

55 वर्षांच्या व्यक्तीकडून चिमुकलीवर अत्याचार

AKOLA : पुण्याच्या नरसापुर इथल्या घटनेनंतर अकोल्यातूनही एक संतापजनक घटना समोर आलीये..अकोल्यातील चान्नी इथं एका 55 वर्षांच्या व्यक्तीनं एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलीये.. पीडित मुलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर जात असताना शेजारी राहणाऱ्या या वृद्धाने संधी साधत सलग तीन ते चार दिवस मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे... भीतीमुळे गप्प बसलेल्या चिमुकलीने अखेर धैर्य दाखवत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.. यानंतर संतप्त पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली...पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले आहेत.. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे...

06 May 2026 11:37 AM (IST)

जालन्यात परतवाड्याची पुनरावृत्ती

JALANA : जालन्यात परतवाड्याची पुनरावृत्ती झालीय.. तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.... जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात ही घटना घडली आहे....आरोपी शेख इम्रान शेख हबीबविरुद्ध तरुणीची पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.... तरुणीवर नमाज पढण्याचा आणि बुरखा घालण्याचा दबाव आणण्यात आल्याचं देखील या तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.... वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचं देखील तरुणीने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.... दरम्यान या प्रकरणी पारध पोलिसांनी शेख इम्रानसह कुटुंबातल्या चौघांवर गुन्हे दाखल केले असून आरोपी शेख इम्रान शेख हबीब सह दोन जणांना अटक करण्यात आली आहे....पारध पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत

06 May 2026 11:33 AM (IST)

अंगणवाडी मदतनीस महिलेवर अत्याचार 

BEED : बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे... तीन वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचाराची घटना ताजी असताना केज तालुक्यात आता एका अंगणवाडी मदतनीस महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे...पीडित महिलेला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन, तिचे आक्षेपार्ह फोटो काढले... त्यानंतर मे 2025 पासून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला... फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विविध लॉजवर अत्याचार करणाऱ्या विकास लक्ष्मण खाडे नामक नराधमाला युसूफ वडगाव पोलिसांनी आता अटक केली आहे...

06 May 2026 10:50 AM (IST)

टिंबर ट्रेडर्सच्या गोदामाला भीषण आग

NAGPUR : नागपुरातील कळमनामधील चिखली लेआऊट परिसरात टिंबर ट्रेडर्सच्या गोदामाला भीषण आग लागली... या आगीमुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं.... या घटनेत  सागवान लाकूड, दोन वूड कटिंग मशीन, टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णतः जळून खाक झाल्या... त्यामुळे  सुमारे 1 कोटी 25 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवलायं.... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.... मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

06 May 2026 10:39 AM (IST)

तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू 

JUNNAR : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील तळेरान गावात अतिशय हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडलीय. खेळताखेळता पाझर तलावात उतरल्याने 10 वर्षांच्या जुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय..या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे....

06 May 2026 09:47 AM (IST)

थलपती विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

THALAPATHY VIJAY : थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. थलपती विजय यांची विधिमंडळ गटनेता म्हणून एकमतानं निवड करण्यात आली.. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्यात. त्यामुळे बहुमत नसतानाही सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केलाय.. टीव्हीकेनं आपल्या सर्व आमदारांना महाबलीपुरममधील एका हॉटेलवर ठेवलंय.. तत्पूर्वी थलपती विजय यांनी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी केलीय. याबाबत काँग्रेसनंही सकारात्मकता दर्शवत तामिळनाडू काँग्रेस निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी म्हटलंय... त्यामुळे आता काँग्रेस द्रमुकची साथ सोडणार का याबाबत चर्चा सुरु झाल्यात..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

06 May 2026 09:44 AM (IST)

पुणेकरांवरील पाणी संकट तूर्तास टळलं 

PUNE : पुणेकरांसाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे... ३१ मेपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणांमध्ये १०.१३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो गतवर्षीपेक्षा अधिक आहे... ‘एल निनो’मुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने १५ टक्के कपातीची मागणी केली होती.... मात्र, सध्याच्या परिस्थितीत कपात टाळण्यात आली आहे... पुढील स्थितीचा आढावा ३१ मेनंतर घेतला जाणार असून आवश्यकतेनुसार निर्णय होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

06 May 2026 09:42 AM (IST)

मोनोरेल मेअखेर मुंबईकरांच्या सेवेत

MONORAIL : चेंबूर-संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे..... ही सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने  एमएमआरडीएने पाऊले उचलण्यास सुरुवात केलीयं...  मोनोरेल मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्यांसाठी निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.....  या निवृत्त अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथक पुढील आठवड्यात सीएमआएस चाचण्यांना सुरुवात करणारेय.... ती पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्तीनंतर मे अखेरपर्यंत मोनोरेल सेवा सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

06 May 2026 08:56 AM (IST)

मराठवाड्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई 

MARATHWADA PETROL ISSUE : मराठवाड्यात 4 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका शेतीला बसताना दिसतोय...इंधन तुटवड्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत..सोबतच विहिरींचं खोदकामही रखडले आहे...ट्रॅक्टर,जेसीबी, पोकलेनसारखी मशीन्स डिझेलच नसल्याने जागेवर उभी आहेत... खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना शेतीची कामे ठप्प झाल्याने प्रशासनाने तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे...

About the Author