8 Apr 2026, 22:39 वाजता
खरातप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी महिलांना सुनावले खडेबोल
Sharmila Thackeray on Kharat : शर्मिला ठाकरे यांनी कॅप्टन खरात प्रकरणावरून महिला वर्गाला चांगलेच खडेबोल सुनावलेत... व्हिडिओत कोणतीही महिला बेशुद्ध दिसत नाही... महिलांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये, असं आवाहन देखील शर्मिला ठाकरे यांनी केलं... आम्हाला देखील अनेक भोंदूबाब भेटायला आले पण आम्ही कधी त्यांच्या पाया पडलो नाही... असं देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Apr 2026, 22:05 वाजता
भोंदू अशोक खरातविरोधात श्रीरामपुरात नवा गुन्हा दाखल
Ashok Kharat Shrirampur Case : भोंदू अशोक खरातविरोधात श्रीरामपुरात नवा गुन्हा दाखल... धमकावणे,खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खरात आणि दोन साथीदारांविरोधात गुन्ह्याची नोंद.. पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Apr 2026, 21:26 वाजता
भोंदू अशोक खरातची लुटारू 'स्पेशल 26' टीम
Ashok Kharat 'Special 26' team : अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय.. अशोक खरातने नकली आयकर अधिकारी पाठवून स्वतःच्याच ओळखीतील लोकं आणि भक्त असलेल्या व्यावसायिकांकडून पैसे उकळले अशी माहिती सूत्रांनी दिलीय.. अगदी हिंदी सिनेमातल्या 'स्पेशल 26' सारखा हा सगळा प्रकार राबवला गेला असंही बोललं जातंय.. नकली इन्कमटॅक्स अधिकारी पाठवून खरातने स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Apr 2026, 21:04 वाजता
भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडीतून सुटका नाहीच
Ashok Kharat Custody : अशोक खरात पोलीस आणि एसआयटी कोठडीतून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे.. अशोक खरातची तिस-या गुन्ह्यातही एसआयटी चौकशी होणार आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता एक प्रकरणाची कोठडी संपली की दुस-या प्रकरणात कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. खरातवर दाखल गुन्ह्यांची संख्या पाहता पुढचे काही दिवस त्याची सुटका नाही हे स्पष्ट झालंय. दुसरीकडं ईडीच्या गुन्ह्यात खरातला मुंबईला चौकशीसाठी नेण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Apr 2026, 19:15 वाजता
नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद- गोपीचंद पडळकर
Padalkar on Nashik Molestation : नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण समोर आलंय. एका प्रसिद्ध कंपनीत मुलींचं लैंगिक शोषण करून धर्मांतर करण्यात आलंय, असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. कंपनीतील काही टीम लीडर हिंदू मुलींना लक्ष्य करतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात, असा आरोप पडळकरांनी केलाय. आतापर्यंत 9 मुली समोर आल्या असून नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असंही पडळकरांनी सांगितलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Apr 2026, 18:08 वाजता
नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर अत्याचार
Nashik Molestation : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. या प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून 6 आरोपींना अटक करण्यात आलीये.. कंपनीत महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय... दरम्यान पीडित महिलांकडून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला असून लव्ह जिहादचाही संशय व्यक्त करण्यात आलाय.. या प्रकरणाचं गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक स्थानप केलंय.. तसंच सर्व खासगी संस्थाना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देशही दिलेत.. महिलांना तक्रार दाखल करण्यासाठी व्हॅट्स अॅप क्रमांक तसंच 112 या कंट्रोल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. या क्रमांकांवर तक्रार करणा-यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Apr 2026, 16:38 वाजता
पार्थ पवार उद्या राज्यसभेत खासदारकीची शपथ घेणार
Parth Pawar : राष्ट्रवादी काँग्रेससाठी उद्या मोठा दिवस असणार आहे.. पार्थ पवार राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत.. दिल्लीत होणाऱ्या या सोहळ्याला सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.. आज रात्रीच पक्षाचे महत्त्वाचे नेते दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
8 Apr 2026, 16:07 वाजता
नांदेडमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी
Nanded Rada : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये भरदिवसा दोन गटात तलवारीने हाणामारी झाली. शहरातील उमर चौकात पैशाच्या देवाणघेवाण आणि राजकीय वैमनस्यातून दोन गटामध्ये हा राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी तलवारी, चाकू यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर वार केले. या घटनेत शेख शाकीर, शेख रईस आणि शेख कलीम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमींपैकी शेख रईस आणि शेख कलीम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर शेख शाकीर यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर हिमायनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
8 Apr 2026, 14:15 वाजता
युद्धविरामानंतर सोनं-चांदीला नवी झळाळी
Gold : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धविरामानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय...सोने प्रतितोळा 3 हजार 600 रुपये तर चांदी तब्बल 10 हजार रुपयांनी महाग झालीये.. 3 हजार 600 रुपयांच्या दरवाढीसह सोने 1 लाख 56 हजारांवर पोहोचले आहे...तर चांदीने अडीच लाखांचा टप्पा पार केलाय..दरम्यान सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलाय..
8 Apr 2026, 13:39 वाजता
नांदेडमध्ये भंडाऱ्याच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा
Nanded : नांदेड जिल्हयातील उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे भंडाऱ्याच्या जेवनातून तब्बल दोनशे जणांना विषबाधा झाली.... गावातील भवानी माता मंदिरावर भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आंबीलमधून विषबाधा झाली... या सर्व रुग्णांना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.... अत्यवस्थ चार रुग्णांना नांदेडला हलवण्यात आले... उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे काल भंडाऱ्याचा कार्यक्रम होता... दुपारी बारा वाजेपासूनच मंदिरासमोर भंडाऱ्याला सुरुवात झाली... सायंकाळी अनेक भाविकांना पोटदुखी, जुलाब, उलटी होऊ लागली.... काही जणांनी जवळच्या खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले... औषधी, गोळ्या घेऊन हे सर्व रुग्ण परत घरी गेले... रात्री रुग्णांची संख्या वाढतच गेली. अनेकांना त्रास जाणवू लागला.... उमरी ग्रामीण रुग्णालयात महिला, पुरुष, लहान बालके मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल झाले होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा-