Maharashtra SSC 10th Results 2024 LIVE: दहावीचा निकाल जाहीर; इथं पाहा संपूर्ण मार्कशीट

Maharashtra SSC 10th Results 2024 LIVE:  दहावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसह पालकांना धाकधूक; पाहा कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल...  

Maharashtra SSC 10th Results 2024 LIVE: दहावीचा निकाल जाहीर; इथं पाहा संपूर्ण मार्कशीट

Maharashtra SSC 10th Result 2024 LIVE Updates: ​ शालेय जीवनाचा टप्पा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकण्याचा आणखी एक टप्पा म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांच निकाल आज (27 मे 2024) लागणार आहे. 

अधिकृत माहितीनुसार दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तर, सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निकालाबद्दल माहिती देतील. ज्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल पाहता येईल. 

27 May 2024, 08:41 वाजता

Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा? 

 2023 -2024 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांच्या वतीनं ही परीक्षा घेण्यात आली होती. 

27 May 2024, 08:16 वाजता

Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: कोणत्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार? 

दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटना भेद द्या 

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org  
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

27 May 2024, 08:15 वाजता

Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: वेळा लक्षात ठेवा 

सोमवारी सकाळी 11 वाजता बोर्डाच्या पत्रकार परिषदेदरम्यान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष इयत्ता दहावीचा राज्यातील निकाल जाहीर करतील. ज्यानंतर दुपारी 1 वाजता निकाल सर्व संकेतस्थळांवर उपलब्ध असेल. चार ते पाच संकेतस्ळथळांवर निकाल उपलब्ध असेल.