Maharashtra Results LIVE: नाना पटोले यांनी महायुतीला आश्वासनांची आठवण करुन दिली

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE:  राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? ठळक घडामोडी आणि निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Results LIVE: नाना पटोले यांनी महायुतीला आश्वासनांची आठवण करुन दिली

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

23 Nov 2024, 08:12 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मालेगावातून शिवसेनेचे दादा भुसे पिछाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: येवल्यातून छगन भुजबळ पोस्टल मतमोजणीत आघाडीवर तर, मालेगावात अद्वय हिरे आघाडीवर असून शिंदेसेनेचे दादा भुसे पिछाडीवर आहेत. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे सांगळे उदय पिछाडीवर आहेत. 

23 Nov 2024, 08:11 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्यात मतमोजणीला सुरुवात; देवेंद्र फडणवीस, पटोले आघाडीवर

पोस्टल मतांची मोजणी सुरू, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस पोस्टल मतांमध्ये आघाडीवर

23 Nov 2024, 08:11 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सांगोला विधानसभा मतदारसंघात टपाली मोजणीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील आघाडीवर

23 Nov 2024, 08:04 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पहिल्या कलांनुसार घनसावंगी येथून राजेश टोपे आघाडीवर आहेत. 

23 Nov 2024, 07:59 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्यात मतमोजणीला सुरुवात; निकालाचे वेगवान अपडेट एका क्लिकवर

औंरगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे आघाडीवर, पोस्टल मत मोजणीला सुरुवात

23 Nov 2024, 07:15 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: जळगावात अपक्षांसाठी विमान तयार, महायुती अलर्ट मोडवर

महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांसह विजयी उमेदवार तातडीने मुंबईकडे रवाना होण्यासाठी जळगाव विमानतळावर व्यवस्था करण्यात आली आहे. निकालाच्या काही फेऱ्या झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले की लगेच सर्व महायुतीला पाठिंबा देणारे अपक्ष आणि महायुतीचे उमेदवार मुंबईकडे रवाना होणार. जळगाव विमानतळावर याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने झी 24 तासला माहिती दिली आहे. 

23 Nov 2024, 07:14 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बच्चू कडू, रवी राणा, यशोमती ठाकूर यांचे राजकीय भवितव्य पणाला

अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातील मतमोजणी आज होणार आहे. अमरावतीच्या लोकशाही भवनात अमरावती व बडनेरा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. सर्व मतदार संघाची प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कोणाचा विजय होणार याचा अंदाज येणार आहे. अचलपूर मधून बच्चू कडु, बडनेरा मधून रवी राणा व तिवसा मधून यशोमती ठाकूर यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. 

23 Nov 2024, 06:52 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बारामतीत कोण मारणार बाजी?

बारामती विधानसभेच्या मतमोजणीला अगदी काही वेळात सुरुवात होणार आहे.बारामती मधील वाखार महामंडळाच्या गोदामात हि मतमोजणी पार पाडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत या ठिकाणी पार पडतेय. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे

23 Nov 2024, 06:52 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रत्नागिरीत पाच विधानसभा मतदार संघातील मतमोजणीची तयारी पूर्ण 

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 26 राऊंड. दापोली विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 28 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान झाले आहे. 

23 Nov 2024, 06:06 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?

तुळजापूर ,उमरगा, धाराशिव व परंडा या चार विधानसभा मतदार संघाची आज मतमोजणी पार पडणार आहे. जिल्ह्यातील ६६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. या मतमोजणीसाठी पंधराशे पोलीस पंधराशे होमगार्ड तर सव्वाशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील धाराशिव, उमरगा, तुळजापूर आणि परंडा या चार ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. चार मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली असून एक मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस तर एका मतदार संघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत झाली आहे. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत व भाजपाचे तुळजापूरचे उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिल आहे .