Old Pension Scheme Strike : दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, रुग्णसेवेचे तीन तेरा

Wed, 15 Mar 2023-3:40 pm,

Maharashtra Old Pension Scheme Strike Live Updates: जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आज दुसऱ्या दिवशी संप सुरु आहे. सरकारी कर्मचा-यांना संप मागे घेण्याचं एकीकडे आवाहन सरकार करतंय. तर दुसरीकडे संप मोडून काढण्यासाठीची तयारीही सरकारने सुरू केल्याचं दिसून येतंय. ( Old Pension Maharashtra Strike) मेस्मा कायदा विधेयक दोन्ही सभागृहात चर्चेविना काल मंजूर करण्यात आलं.

Maharashtra Old Pension Scheme Strike Live Updates: सरकारी कर्मचा-यांना संप मागे घेण्याचं एकीकडे आवाहन सरकार करतंय. तर दुसरीकडे संप मोडून काढण्यासाठीची तयारीही सरकारने सुरू केल्याचं दिसून येतंय. ( Old Pension Maharashtra Strike)  मेस्मा कायदा विधेयक दोन्ही सभागृहात चर्चेविना काल मंजूर करण्यात आलं. ( Maharashtra Strike) मेस्माची मुदत 28 फेब्रुवारी 2023 ला संपली होती. त्यानंतर राज्यात मेस्मा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मेस्मा कायद्याची पुनर्स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता सरकार संपकरी कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करू शकणार आहे.  संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांवर सहा महिन्यांपर्यंत तुरूंगवास किंवा दंडाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आलीय. 

Latest Updates

  • जुन्या पेन्शन बाबत कमिटी स्थापन - केसरकर 
    Old Pension Maharashtra Strike : आम्ही जुन्या पेन्शन बाबत कमिटी स्थापन झालेली आहे. अनेक तज्ज्ञ लोकं या कमिटीमध्ये आहेत . त्याच्या अडचणी नेमक्या काय आहेत ते जर  का सांगितलं तर त्यातून मार्ग काढतील. मात्र हे असताना विद्यार्थ्यंाचं नुकसान होऊ देणार नाही याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. तातडीनेचे निर्णय घेताना, बाह्य यंत्रणेची मदत घेतली जात आहे. नोकरभरती होत असल्याने 10वर्ष तात्पुत्या स्वरुपात काम करणाऱ्या या भरतीत 10 टक्के जागा ठेवाव्यात.  पेन्शनसारखे विषय चर्चेतून सोडवावेत. चर्चेत दोन्ही सभागृहातील विरोधीपक्ष नेतेही होते, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

  • मनीषा कायंदे यांचा सरकारवर हल्लाबोल

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Old Pension Maharashtra Strike : 18 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपावर आहेत. 2005 नंतर आपल्या देशात नवीन पेन्शन योजना झाली. जे लोकं 2005 च्या आधी लागले आहेत पण त्यांना ही योग्य ती पेन्शन मिळत नाही. सरकार गळचेपी करत आहेत.- पूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते त्यांची नियुक्ती केली जायची. मात्र कुठलेही कर्मचारी अस्तिल त्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी कंपन्या नेमल्या गेल्या आहेत. एक प्रकारे मोगलाई सुरु झाली आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केला आहे.

    जर कामावर आले नाही तर मग दुसरा पर्याय ठेवला आहे. काल आम्ही सर्व आमदार बाहेर पडलो करण हे सरकार असंवदेशानशील आहे. आज पेपर तपासायचे आहेत, हॉस्पिटल वर कामं स्थिर नाही. कोणालाच हे सरकार न्याय देऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

  •  मेस्मा : सरकारची शत्रूत्वाची भावना, कर्मचाऱ्यांचा आरोप

    Old Pension Agitation : मेस्मा विधेयक तातडीने संमत करून सरकारने शत्रूत्वाची भावना असल्याचं दाखवलंय अशी टीका राजपत्रित अधिकारी संघाचे प्रमुख सल्लागार ग. दी. कुलथे यांनी केलीय. चर्चेऐवजी केवळ वेळ काढण्यासाठी सरकारने समिती स्थापन केल्याची टीका त्यांनी केली. 

  •  सरकारी कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Old Pension Agitation : राज्य सरकारी कर्मचा-याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलाय. सरकारी कर्मचा-यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरीकडे अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामेही रखडले. त्यामुळे शेतक-यांना नुकसानभरपाई कधी मिळणार याची चिंता सतावत आहे. तर या संपात शिक्षकही सहभागी झालेत.. संपकरी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिलाय. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. 

    नागपुरात शासकीय वैद्यकीय रूग्णालयात शुकशुकाट आहे. कर्मचारी, तंत्रज्ञ, परिचारिका संपामुळे आलेच नाहीत. त्यामुळे रूग्णसेवा कोलमडली आहे. अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.

  •  राज्यातील शासकीय-निमशासकीय नोक-यांचं खासगीकरण?

    Old Pension Agitation : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यात संघर्ष पेटला असतानाच आता राज्यातील शासकीय-निमशासकीय नोक-यांचं खासगीकरण होणार आहे... प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. यातून वाचणारा पैसा विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. राज्यात सफाई कामगार, शिपाई अशा चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचा-यांचं आधीच खासगीकरण झालंय. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या धोरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेताला आहे. त्यानुसार शासकीय, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसंच सरकारशी सबंधित अन्य कार्यालायातील नोकरभरती खाजगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे...ही पदभरती सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीकडूनच केली जाणार आहे.  

  • संपाचा मोठा फटका विदर्भात आरोग्य सेवेला
    Old Pension Agitation : सरकारी कर्मचारी संपाचा मोठा फटका विदर्भात आरोग्य सेवेला बसला आहे. परिचारिका, तंत्रज्ञ ,तृतीय ,चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर गेले आहे. शेकडोंनी शस्त्रक्रिया खोळबल्या आहेत. रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी संपूर्ण विदर्भातून रूग्ण येतात. 

  • आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी
    Old Pension Agitation : आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी.. दहावी आणि बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या शिक्षकांच्या संपामुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तसापण्यास नकार दिलाय. जवळपास 50 हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या संपात सहभाग घेतलाय... त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.. निकाल उशीरा लागणार असल्यानं  विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढलीये

  •  दोन हजार आरोग्य कर्मचारी संपावर 

    Old Pension Agitation :  एकीकडे राज्यात कोरोना, H3N2चे रुग्ण वाढतायत... दोन मृत्यूही झाल्याचा संशय व्यक्त होतोय. मात्र दुसरीकडे कर्मचा-यांचा संप सुरूय. त्याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होतोय. कर्मचारी संपाचा परिणाम संभाजीनगरात दिसून येतोय. घाटी रुग्णालयातील संपामुळे पहिल्याच दिवशी जवळपास 15 शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. घाटी रुग्णालयातील बाराशे आणि जिल्ह्यातील जवळपास दोन हजार आरोग्य कर्मचारी संपावर आहेत. याचा फटका आता रुग्णसेवेला बसताना दिसतोय. शस्त्रक्रिया रद्द झाल्यानंतर काही रुग्णांचे चांगलेच हाल झालेत तर काहींना शक्य नसताना खाजगी दवाखान्याकडे जावं लागलं. आजही हा संप कायम आहे आणि यामुळे रुग्णसेवा पूर्ण कोलमडू शकते.. दरम्यान घाटी रुग्णालयात 300 परिचारिकांची सोय करण्यात आलीय. त्यांच्याकडून सेवा देण्यात येईल असे प्रशासन सांगत आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link