कल्याणमध्ये आगरी मतांवरून राजकारण तापलं
कल्याणमध्ये जातीपातीचं राजकारण रंगु लागलंय..
आतीश भोईर, झी मीडिया, कल्याण : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कल्याणमध्ये जातीपातीचं राजकारण रंगु लागलंय.. आगरी मतांवर डोळा ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी श्रीकांत शिंदेंवर खळबळजनक आरोप केलाय. त्या कल्याणमध्ये आगरी मतांवरुन राजकारण तापलंय.. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंवर खळबळजनक आरोप केलेत.. श्रीकांत शिंदे यांनीही बाबाजींविरोधात निवडणूक आयोग आणि न्यायलयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितले आहे.
बाबाजी पाटील यांनी केलेला आरोप श्रीकांत शिंदेंनी फेटाळून लावला आहे. बाबाजी पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोग तसंच न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणालेत.. आगरी समाजाच्या नेत्यांनीही श्रीकांत शिंदे यांना पाठींबा दिला आहे.
कल्याण आणि डोंबिवली परिसरात आगरी समाजाचं प्राबल्य आहे. या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत.. मात्र जातीवरुन राजकारण रंगल्यानं आता आगरी मतं कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.