तरुणाच्या डोक्यात कोयता घालून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, लोंढे गँगचं पोलिसांना ओपन चॅलेंज

धक्कादायक बाब म्हणजे लोंढे टोळीचे दोन्ही मास्टरमाईंड प्रकाश आणि दिपक लोंढे हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 17, 2025, 10:24 PM IST
तरुणाच्या डोक्यात कोयता घालून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, लोंढे गँगचं पोलिसांना ओपन चॅलेंज

सागर आव्हाड झी २४तास नाशिक : शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन क्लिन अप सुरु केलं आहे. गुंडांची धिंड काढल्याचे अनेक रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांवरकौतुकाचा वर्षावरही होत आहे. मात्र नाशिक पोलिसांचं हे क्लिन अप ऑपरेशन खरोखर यशस्वी ठरतंय का असा सवाल उपस्थीत होत आहे. आणि त्याला कारण ठरलीये सातपूरची लोंढे गँग.

Add Zee News as a Preferred Source

नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेला हा प्रकाश लोंढे...आणि दीपक लोंढे..  सातपूरच्या लोंढे टोळीचे हे मास्टरमाइंड.. सातपूरमध्ये या गँगची मोठी दहशत आहे. नाशिकमधली गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात क्लीनअप ऑपरेशन सुरु केलं आहे. त्यात या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात..त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी यूपी पॅटर्न प्रमाणे त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझरही चालवण्यात आला.

या कारवाईमुळे लोंढे टोळीची दहशत कायमची संपेल असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र पोलिसांचा हा अंदाज खोटा ठरलाय.. कारण चंद्रकांत विश्वकर्मा नावाच्या तरुणावर याच टोळीतील काही गुंडांनी कोयत्यानं जिवघेणा हल्ला केला आहे. इतकच नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे लोंढे टोळीचे दोन्ही मास्टरमाईंड प्रकाश आणि दिपक लोंढे हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. असं असतानाही त्यांच्या टोळीनं तरुणावर हल्ला करुन एक प्रकारे पोलिसांना ओपन चॅलेंजच दिलंयं.. त्यामुळे नाशिक पोलिसांचं ऑपरेशन क्लीन अप फेल होतंय की काय अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More