Namdev Shastri Exclusive: मी धनंजय (Dhananjay Munde) यांचा चेहरा आणि हाताला सलाईन लावलेलं पाहिलं. सलाईनसह ती व्यक्ती भगवानगडावर येते आणि डॉक्टर त्याला सलाईन लावतात. एका संताच्या ह्रदयाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? अशी विचारणा महंत नामदेव शास्त्री (Mahanat Namdev Shastri) यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवानगडावर दाखल झाले होते. यानंतर पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला. 'झी 24 तास'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्या भूमिकेमागील कारणांचा उलगडा केला आहे.
"53 दिवस झालं तो माणूस आघात सहन करतो. त्याच्या हाताला सलाईन आहे, त्याची मानसिक अवस्था ठीक नाही, चेहरा मला पाहवात नाही. एका छोट्या वाक्यावरुन इतकं रान उठलं आहे. धनंजय यांची काय मानसिक हत्या करायचा विचार आहे का? त्याने किती सहन करावं? 53 दिवस झाले सहन करत आहे. हंबरडा फोडतोय तरी कोणी पाहत नाही. मी जरा त्यांच्यासाठी बोललो आणि सगळे तुटून पडत आहेत. हत्येचं समर्थन नाही तर एका व्यक्तीला समर्थन असून, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत," असं त्यांनी स्पष्ट केलं.
"किती सोसावं, वय झालं ना आता. पन्नाशी गाठत आल्यानंतरही धनजंय टाकेचे घावत सोसत आहेत. दया येत नाही, फक्त प्रेम अभिव्यक्त केलं आणि त्याचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं," असं नामदेव शास्त्रींनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात नेमकं काय दिसलं? असं विचारलं असता ते म्हणाले की, "मला खूप त्रास होतो, जगू नये असं वाटत होतं. मी त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा केली. त्यांना समजून सांगितलं, धीर दिला. तुम्ही नीट पाहिलं तर हाताला सलाईनची सुई लावली होती आणि त्यातून रक्त येत आहे. समाजाने, राजकारणाने इथपर्यंत जीव घ्यावा हे मला पटत नाही".
नेमकी काय चर्चा झाली? या प्रश्नावर ते म्हणाले की, "अडीच तास चर्चा झाली. अर्जुनाचं महत्वाचं काय, अर्जुन पण निराशेत गेला होता. कृष्णाने कसं कर्तव्य कर्म करण्यास भाग पाडलं हे समजावून सांगितलं. त्याची मानसिकता मजबूत केली. भगवानगडावर पहिल्यांदा त्यांना शांत झोप लागली. 53 दिवसांत पहिल्यांदा शांत झोपले. मी डोळ्याने पाहिल्यानंतर भगवानगड पाठीशी आहे म्हटलं. याचं फार मोठं राजकारण करु नये असं वाटतं. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नये. दोषी दोषी असतो. मी पाठिंबा दिला म्हणून न्यायालय सोडत नाही".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
KKR
(20 ov) 192/5
|
VS |
CSK
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.