Mahapalika Election 2026, Money Distribution: पालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यभरात पैसे वाटपावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तर कुठे सत्तेत असलेले मित्रपक्षच एकमेकांवर आरोपांचे बॉम्ब डागतायत, सोलापुरमध्ये भाजप उमेदवाराच्या मुलानं पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाचा पैसे वाटतानाचा व्हिडीओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आलाय.
संभाजीनगरमध्येही भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी हा आरोप केलाय. एका मताला 4 हजार रूपये दिले जात असल्याचा आरोप दानवेंनी केलाय. यावर भाजप नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत "तुम्ही काय गुपचूक बसलायत का?" असा प्रश्न करून शिवसेनेला डिवचलं आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये देखील पैसे वाटपावरून वाद उफाळून आला आहे. युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपमध्येही पैशांच्या वाटपावरून वाद पाहायला मिळाला, अमरावतीच्या बेलपूरभागात भाजपनं पैसे वाटल्याचा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय.
तसेच, वसई पूर्व वॉर्ड क्रमांक 19 मधील वसई फाटा आणि गांगडी पाडा परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना पिशव्यांसह पकडल्याचा दावा केला जात आहे.
मुंबईत पैसे वाटपाच्या आरोपावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलीये. भाजप उमेदवार शिल्पा केळुस्करांच्या पदाधिका-यांवर पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय... सायनच्या प्रभाग क्रमांक 173मध्ये हा पैसे वाटल्याचा आरोप करण्यता आला आहे.
विरोधकांनी भाजपवर केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. जे पैसे वाटत असतील त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता ही भाजपची भूमिका नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय.
पालिका निवडणुकीत पैसे वाटपावरून चांगलंच रान पेटलंय. अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसंच या पैशांच्या वादात हाणामारी देखील झाल्या आहेत. मात्र, पैशांचं वाटप कधी थांबणार? पैसे वाटणा-यांवर वचक नाही का? असा सवाल देखील यानिमित्तानं उपस्थित करण्याता येतोय.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
CAN
156/8(20 ov)
|
| South Africa beat Canada by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19.5 ov) 103
|
VS |
ZIM
106/2(13.3 ov)
|
| Zimbabwe beat Oman by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 207/4
|
VS |
ITA
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.