Maharashtra 10th SSC Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra 10th SSC Result 2025:  बारावीच्या निकाल लागला असून आता विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत आहे. अशातच महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालापूर्वीच आनंदाची बातमी दिली आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 12, 2025, 06:01 AM IST
Maharashtra 10th SSC Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra 10th SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी आणि पालक प्रतीक्षेत आहेत ते दहावीच्या (SSC) निकालाची. खरंतर महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केली नाहीय. महाराष्ट्र बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे की, पुढील दोन आठवड्यांत निकाल जाहीर होणार. पण दहावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र बोर्डाने दिलासादायक बातमी दिली आहे. (Maharashtra 10th SSC Result 2025 Good news for class 10 students even before the results )

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी या कॉलेज ते कॉलेजच्या पायऱ्या चढावा लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. 

हेसुद्धा वाचा - CBSE Result 2025: उद्या जाहीर होणार CBSE चा 10 वी आणि 12 वीचा निकाल?; चेक करा डायरेक्ट लिंक

महाराष्ट्र बोर्डाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइनच होणार असून यासंदर्भात बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. अनधिकृत वेबसाइट्सवरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केलं आहे. तर प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असं आवर्जून सांगितलं आहे. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यावी. 

या संकेतस्थळावरून करा नोंदणी!

तसंच अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केला आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे.