CM Devendra Fadnavis Angry: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना निवड टीका करु नका असं सुनावत थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करत निशाणा साधला.
अबू आझमींनी केलेल्या विधानावरुन विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षातील आमदारांनी अबू आझमींच्या अटकेची मागणी केली. या विषयावर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "सभापती मोहोदय जेलमध्ये टाकीन. 100 टक्के टाकू," असं अगदी मोठ्या आवाजात सांगितलं.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या बाकावर बसलेल्या आमदारांना उद्देशून, "तुम्ही नीट माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. त्या कोरटकरने न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळवलं आहे. मात्र मी त्याच्यावर जायला सांगितलं आहे. मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलले त्यावर तुम्ही कधी निषेध केला नाही. जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की, औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब किती बलाढ्या होता. महाराज पाच फुटाचे होते, हे रेकॉर्डवर बोलले. तेव्हा नाही निषेध केला तुम्ही. असा सिलेक्टीव्ह निषेध करु नका. तेव्हा तुम्ही निषेध नाही केला," असं म्हणत सुनावलं.
इतक्यावरच न थांबता मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी पंतप्रधान जवहारलाल नेहरुंच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकाचा उल्लेख करत त्यामधील माहितीला निषेध विरोधक करणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला. "पंडित जवाहरलाल नेहरुंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं आहे त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिंमत? आहे का हिंमत? आहे का हिंमत तुमच्यामध्ये? आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था! महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था!" असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी संतापून म्हटलं.
यादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरु केल्याने अध्यक्ष रामराजे शिंदेंनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केलं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More
LIVE|
ENG
253/7(20 ov)
|
VS |
IND
226/7(19.2 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.