धक्कादायक, मूल होत नसल्याने हॉस्पिटलमधून बाळाची चोरी

Baby theft at Hospital : एक धक्कादायक बातमी. हॉस्पिटलमधून  (Sassoon Hospital) बाळाची चोरी करण्यात आली. ( 

Updated: Sep 10, 2021, 01:10 PM IST
धक्कादायक, मूल होत नसल्याने हॉस्पिटलमधून बाळाची चोरी title=

पुणे : Baby theft at Hospital : एक धक्कादायक बातमी. येथील ससून हॉस्पिटलमधून  (Sassoon Hospital) बाळाची चोरी करण्यात आली. (Baby stolen from Pune) नर्सच्या वेशात आलेल्या महिलेने बाळाला पळवून नेले. याप्रकरणी आरोपी महिलेसह एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मूल होत नसल्याने बाळ चोरल्याची माहिती पुढे आली आहे. (Baby theft at Hospital at Pune in Maharashtra)

हॉस्पिटमधून एका तीन महिन्याच्या बाळाची चोरी केल्याची घटना घडली. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे बाळ सुखरुप मिळाले आहे. नर्सच्या वेशात आलेल्या एका महिलेने तिच्या पतीच्या मदतीने बाळाला पळवंल होते. पोलिसांनी तिच्यासह तिच्या पतीला अटक केली आहे. मूल होत नसल्याने त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

26 वर्षीय एक महिला आपल्या पतीसोबत नर्स ड्रेस करुन ससून हॉस्पिटलमध्ये घुसली. त्याठिकाणी या महिलेने संधी साधून एका तीन महिन्याच्या बाळाला वॉर्डातून पळवले. दरम्यान, बाळाच्या आईला आपले बाळ गायब असल्याचे पाहून तिने हंबरडा फोडला आणि हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.

कोणाला काय झाले ते समजत नव्हते. मात्र, काही वेळात तिचे बाळ चोरल्याचे समजले आणि रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. बाळ चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात तणाव निर्माण झाला. बाळी चोरीची त्वरित पोलिसांना माहिती  देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच नर्सच्या वेशात आलेल्या  महिलेला आणि तिच्या पतीला अटक केली.

 ससून हॉस्पिटलची सुरक्षा यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे. नर्सच्या वेशभूषेत हॉस्पिटलमध्ये दाखल होत बाळ पळवल्याने ससून रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.