Pune Fraud Voting List : महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार यादी घोटाळा पुण्यात झाला आहे. एका घरावर 813 मतदारांची नोंद झाली आहे. जयंत पाटील यांनी पुणे कँन्टोनमेंट मतदारसंघात बोगस मतदार नोदींचा गंभीर आरोप केला. मंगळवार पेठेतील बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या एकाच पत्त्यावर तब्बल 813 बोगस मतदार नोंदले गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
याप्रकरणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केला. जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी झी २४ तासनं थेट पत्ताच शोधून काढला. यामध्ये घर क्रमांक 226 असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात ती 226 क्रमांकाची गल्ली निघाली. जयंत पाटील यांनी पुणे कँन्टोमेॆट मतदार संघातील मंगलवार पेठेतील बूथ क्रमांक 30 वर घर क्रमांक 226 या एकाच पत्त्यावर तब्बल 813 बोगस मतदार नोंदले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच आरोपाची पडताळणी करण्यासाठी आम्ही थेट पत्ताच शोधून काढला असता ती 226 क्रमांकाची गल्ली निघाली.
मतदार यादीतील या घोळाबाबत सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे आणि स्थानिक आंबेडकर वादी कार्यकर्ता संतोष भिमाले यांच्याशी exclusive बातचीत केली. झी 24 तासने जयंत पाटील यांनी आरोप केलेल्या बूथ क्रमाक 30 ची मतदार यादीच शोधून काढली असता त्या मतदार यादीतील बहुतेक मतदारांचा पत्ता हा मंगलवार पेठ, घर क्रमांक 226 असा आढळून आला प्रत्यक्षात ती गल्ली निघाली.
निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर विरोधकांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली यामध्ये जयंत पाटील यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 211 मध्ये 450 मतदारांचा घर क्रमांक 0 असल्याचा उल्लेख केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात मतदार यादीत तब्बल 17 हजार 258 दुबार नावे आहेत. असा आरोप शिवसेना UBTकडून करण्यात आला.
ठाकरेंचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी हा आरोप केला. याबाबत त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. मतदार यादीतून ही दुबार नावे काढली नाहीत तर निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा रोहिदास मुंडेंनी दिला.
FAQ
1 महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार यादी घोटाळा कुठे झाला आहे?
हा घोटाळा पुण्यात झाला आहे. एका घरावर ८१३ मतदारांची नोंद झाली आहे, ज्यामुळे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार यादी घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.
2 जयंत पाटील यांनी कोणता गंभीर आरोप केला आहे?
जयंत पाटील यांनी पुणे कँन्टोनमेंट मतदारसंघात बोगस मतदार नोंदींचा आरोप केला आहे. मंगळवार पेठेतील बूथ क्रमांक ३० मध्ये घर क्रमांक २२६ या एकाच पत्त्यावर तब्बल ८१३ बोगस मतदार नोंदले गेल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
3 झी २४ तासने या आरोपाची पडताळणी कशी केली?
झी २४ तासने जयंत पाटील यांच्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी थेट पत्ता शोधून काढला. यामध्ये घर क्रमांक २२६ असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात ती २२६ क्रमांकाची गल्ली निघाली. मतदार यादीत बहुतेक मतदारांचा पत्ता मंगळवार पेठ, घर क्रमांक २२६ असा आढळला, पण तो गल्ली आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.