Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समोरा समोर आले. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. तर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन झाले. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा विधानभवनात आमना सामना झाला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सोबतच होते यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची धावती भेट जाली. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन देखील झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणं टाळलं.
एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरुन भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक होणे अशक्य असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले होते.
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत, मुंबईतील खड्ड्यांवरुन त्यांना टोला लगावला. त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं मात्र मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. असं आदित्य म्हणाले. तर मुंबईत सुरु असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरुन आदित्य यांनी सरकारला टोला लगावला. मुंबई महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदत आहे की त्यांना खोदकामात काही तरी सापडणार असावं असं वाटतं, असं आदित्य म्हणाले.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.