20 एकरमधील MHADA इमारती...; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि विधि व न्याय विभागासंदर्भात निर्णय घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 18, 2025, 03:05 PM IST
20 एकरमधील MHADA इमारती...; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षित युती घडत असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. यादरम्यान राज्य मंत्रिमंडळाने आज बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती, शिक्षकांची 232आणि शिक्षकेतर 107 पदांना मान्यता देण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मंत्रिमंडळ बैठकीत नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि विधि व न्याय विभागासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

1) नगर विकास विभाग

राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण

2) गृहनिर्माण विभाग
बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार

3) मदत व पुनर्वसन विभाग
भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती. यामुळे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकऱणांचा जलदगतीने निपटारा होणार

4) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती. शिक्षकांची 232आणि शिक्षकेतर १०७ पदांना मान्यता

5) महिला व बाल विकास विभाग
महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९ या अधिनियमातील कलम ९ व कलम २६ मधील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळणार

6) विधि व न्याय विभाग
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा कऱण्यास मान्यता

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More