अमरावतीत मतदार यादीत घोळ, 200 मतदार एकाच पत्त्यावर

Amravati News: अमरावतीमध्ये मतदार यादीतला आणखी एक घोळ समोर आलाय. ज्यावरुन भाजपच्या स्थानिक नेत्यावर काँग्रेसने आरोप केलेयत. पाहुयात.  

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 14, 2025, 09:44 PM IST
अमरावतीत मतदार यादीत घोळ, 200 मतदार एकाच पत्त्यावर
maharashtra Election 200 voters at the same address in amravati news

Amravati News: महापालिका निवडणुकांचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळाचा फटका आपल्याला बसू नये यासाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसलीये.अनेक ठिकाणी मतदार यांद्यांबद्दल असलेल्या संशयामुळे त्या वेगवेगळ्या पक्षाकडून बारकाईने तपासल्या जातायत.हे करत असतानाच अमरावतीमध्ये मतदार यादीतला आणखी एक घोळ समोर आलाय. ज्यावरुन भाजपच्या स्थानिक नेत्यावर काँग्रेसने आरोप केलेयत. पाहुयात.

Add Zee News as a Preferred Source

मतदार यांद्यामधले घोळ एकापाठोपाठ पुढे येतायत.कोणी मृत झालेलं असतानाही त्याचं नाव मतदारयादीत आहे. कोणी जिवंत असूनही त्याला मयत दाखवलंय, कोणाचं नाव दोन दोन मतदारयाद्यांमध्ये आहे.तर अनेक मतदारांचा पत्ता कोचिंग क्लास दाखवलाय. यानंतर अमरावतीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकाच पत्त्यावर 200 मतदारांच्या नावाची नोंद आढळलीये. आता 200 मतदार एकाच पत्त्यावर कसे राहात असतील याची शहानिशा करायला आम्ही थेट पत्त्यावर गेलो.त्यात काय आढळलंय पाहा.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्त्यावरच इतके मतदार कसे असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केलाय.बरं असं हे फक्त एक प्रकरण नाहीये.ज्यांच्या घराच्या पत्त्यावर 200 मतदार दाखवलेयत त्या भाजप पदाधिकारी सारंग राऊत यांनीही निवडणुक आयोगावरच प्रश्न उपस्थित केलेयत.यावरुनच युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय आणि याबद्दल कार्यवाहीची मागणी केलीये.

महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यापुर्वीच मतदार याद्यांमधल्या त्रुटी समोर येतायत.निवडणुक आयोग याची तातडीने दखल घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करतो का हे पाहावं लागेल.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More