अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, संपूर्ण Schedule विद्यार्थी व पालकांना माहिती असायलाच हवं!

Maharashtra FYJC Admission 2025: राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास आज पासून सुरुवात

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2025, 12:51 PM IST
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, संपूर्ण Schedule  विद्यार्थी व पालकांना माहिती असायलाच हवं!
Maharashtra FYJC Admission 2025 CAP Round 1 Starts on May 20 Check Schedule

झी मीडिया, चंद्रकांत फुंदे

Maharashtra FYJC Admission 2025: इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापर्यंत केवळ महानगरांमध्येच ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. या प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालये वगळण्यात आली आहेत. राज्यात यंदा अकरावीच्या प्रवेशांची एकूण क्षमता ही 20 लाख 43 हजार 254 इतकी आहे. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक 8 लाख 52 हजार 206 जागांचा समावेश आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी ही येत्या सोमवारपासून (दि.19 मे) सुरू होणार आहे. या फेरीतील पहिले दोन दिवस म्हणजेच 19 व 20 मे हे प्रवेश नोंदणी सरावासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात येत्या बुधवारपासून (दि.21 मे) प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येणार आहे

राज्याच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दि.19 मे सकाळी 11 वाजल्यापासून दि‌. 20 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र (Practice Session) ठेवण्यात आले आहे. हे सराव सत्र केवळ सरावासाठी असणार आहे. यामध्ये भरलेली माहिती 20 मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटविली जाणार आहे. दि. 21 मे रोजी सकाळी 11वाजल्यापासून प्रत्यक्षात नोंदणी सुरू केली जाणार आहे. ही नोंदणी येत्या 28 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार आहे. या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना किमान 1 ते कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. व्यवस्थापन, इन-हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी प्रत्येक फेरीपूर्वी "Consent" आवश्यक आहे

पहिल्या फेरीचे उर्वरित वेळापत्रक पुढीलप्रमाणे

- तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे --- दि. 30 मे, सकाळी 11 वाजता

- हरकती व दुरूस्ती करणे --- दि. 30 मे ते 1 जून 2025 सायंकाळी 4 वाजेपर्यंत

- हरकती व दुरुस्ती प्रक्रिया लॉगीनद्वारे --- दि. 3 जून 2025 सायंकाळी वाजेपर्यंत

- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे --- दि. 5 जून 2025

- गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप करणे (शून्य फेरी) --- दि. 6 जून 2025 सकाळी 10 वाजता

- वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर टाकणे --- दि. 6 जून सकाळी 11 वाजता

- प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी करणे (पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य) --- दि. 6 जून सकाळी 11 वाजल्यापासून 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत

दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर करणे ---- दि. 14 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत

शाखा आणि विभागनिहाय प्रवेश क्षमता
(Intake Capacity)

पुणे विभाग

एकूण जागा --- 3,74,846

कला --- 1,03,7005

वाणिज्य --- 1,01,971

विज्ञान --- 1,70,170

अमरावती विभाग

एकूण जागा --- 1,86,475

कला शाखा --- 80,740

वाणिज्य --- 24,340

विज्ञान ---81,395

छत्रपती संभाजीनगर

एकूण जागा --- 2,66,750

कला --- 1,11,165

वाणिज्य --- 42,615

विज्ञान --- 1,12,870

कोल्हापूर

एकूण जागा --- 1,93,287

कला --- 64,572

वाणिज्य ---48,466

विज्ञान --- 80,240

लातूर विभाग

एकूण जागा --- 1,36,550

कला --- 52,860

वाणिज्य --- 21,260

विज्ञान --- 63,470

मुंबई विभाग

एकूण जागा --- 4,61,640

कला --- 22,955

वाणिज्य --- 2,72,930

विज्ञान --- 1,60,715

नागपूर

एकूण जागा --- 2,14,395

कला --- 76,395

वाणिज्य --- 38,830

विज्ञान --- 99,870

नाशिक विभाग

एकूण जागा --- 2,07,320

कला --- 83,000

वाणिज्य ---37,020

विज्ञान ---86,730

महाराष्ट्रातील एकूण प्रवेश क्षमता

एकूण प्रवेश क्षमता ---- 20,43,754

विज्ञान शाखा --- 8,52,206

वाणिज्य शाखा --- 5,40,312

कला शाखा --- 6,50,682

पालकांनो, हे लक्षात ठेवा

- कॅप (CAP) किंवा कोटामार्फत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाणार

- एकदा विद्यार्थ्यांने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येणार

- प्रवेश नोंदणी शुल्क डिजिटलमाध्यमातूनच स्विकारला जाणार

- सर्वानी प्रवेशाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक

- व्यवस्थापन कोटा इन-हाऊस किंवा अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश 6 जून 2025 पासून सुरू होणार

अकरावी प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा

www.mahafyjcadmissions.in किंवा support@mahafyjcadmissions.in