Maharashtra IAS Transfer : क्रूर शासक मुलघ बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वादंग माजला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत तणाव निर्माण झाला. 17 मार्च रोजी नागपुरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे माहाराष्ट्रात खळबळ माजली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यानंतर आता प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील अति महत्वाच्या जिल्ह्यातील IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत वाद झाला. दोन गटाक वाद सुरु असताना काही समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केला. नागपूरमध्ये काल झालेल्या जाळपोळीनंतर प्रशासनाने तेथील नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केलीय. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाकडून 5 पथकं तयार करण्यात आलीत. या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार असून सरकार नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य करणार असल्याची माहिती आहे.