)
Fakt Ladh Mhana : अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात काटे उभे राहिले. अंबडमधील अक्षता चौधर यांची शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे इंजिनिअर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही याची काळजी अक्षताला लागलीय. त्यामुळे अक्षताला आर्थिक मदत करण्यासाठी झी 24 तासची फक्त लढ म्हणा ही खास मोहीम.
अक्षता चौधरला इंजिनिअर व्हायचं आहे. मात्र तिचं हे स्वप्न पूर्ण होणार की नाही याची चिंता सध्या तिला सतावतेय. त्याचं कारण असं की यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची जालन्यातील अंबड तालुक्यातील दुनगावात असलेली त्यांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. पिकांसह जमीनही खरडून गेलीय. त्यामुळे शिक्षणासाठीचा खर्च पालकांकडून मिळणार की नाही असा प्रश्न तिला पडलाय. अक्षता संभाजीनगरच्या इंजिनिअरिंग द्वितीय वर्षात शिकतेय.
शेतक-यांच्या लेकीला पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही थेट तिच्या बँक खात्यात मदत करू शकता.
अक्षता ज्ञानदेव चौधर
बँक खातं क्रमांक -34911293160
IFSC CODE-SBIN0003407
बँक- स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा- वडीगोद्री, अंबड
GPAY- 9822823048
3 जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याच्या लेकीचं शिक्षण आर्थिक संकटामुळे अपूर्ण राहू नये, यासाठी तिला सढळ हातानं आर्थिक मदत करा हेच झी 24 तासचं सर्वांना आवाहन.