Maharashtra Local Body Election 2025 : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महापालिकांचा कारभार आता प्रशासक अर्थता आयुक्तांच्या हातात आहे.महाराष्ट्रातील आयुक्तांचा कारभार आता संपणार आहे.स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. नगर विकास विभागाचा सुधारित आदेश जारी केला आहे. यात 6 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासक असलेल्या राज्यात एकूण 29 महानगरपालिका (जालना व इचलकरंजी नवनिर्मित), एकूण 248 नगरपरिषदा, एकूण 147 नगरपंचायती, प्रशासक असलेल्या म्हणजे मुदत संपलेल्या व नवनिर्मित 42 नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत.
6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र प्रभाग रचनेचे सुधारित आदेश जारी करत 6 ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगरपालिका, ड वर्गाच्या महापालिकांनी 13 ऑक्टोबरपर्यंत व नगर परिषदेच्या प्रभाग रचना अहवाल 30 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश
नगर विकास विभागाने मुंबई महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना दिले आहेत. नगर विकास विभागाने सोमवार 23 जून रोजी पुन्हा एकदा सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेसह नगर परिषदेच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे.
मुंबई महापालिकेने 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारुप प्रभाग रचना तयार करणे, 17 आणि 18 जून रोजी प्राप्त जनगणनेची माहिती तपासणे, 19 जून ते 4 जुलै स्थळ पहाणी, 5 ते 10 जुलै गुगल मॅप वर नकाशा तयार करणे. 11 ते 24 जुलै प्रभाग हद्दीवर जाऊन तपासणी करणे, 1 ते ऑगस्ट प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करणे, 22 ते 28 ऑगस्ट प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवणे, 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, 9 ते 15 सप्टेंबरपर्यंत सुनावरील शिफारशी प्राधिकृत अधिकाऱ्यांना अंतिम करुन नगर विकास विभागाला सादर करणे, 16 ते 22 सप्टेंबर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेला प्रभाग रचना प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अहवालास मान्यता देणे, 3 ते 6 ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे असे सुधारित आदेश नगर विकास विभागाने सोमवारी जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.