Maharashtra Local Body Election 2025 : महापालिकेची निवडणूक नेमकी कधी असेल हा प्रश्न सातत्यान विचारला जात असतानाच आता निवडणूक आयोग आणि सरकारमध्ये मतभेद असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने दिली असून, त्याच धर्तीवर राज्यातील दोन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाल्याचं पाबायला मिळत आहे.
आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यण्याचा मुद्दा असल्यामुळं सध्या राज्य निवडणूक आयोग या दोन महापालिकांच्या निवडणुका नंतर घेऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं आयोगाकडून काही तासांमध्ये पार पडणाऱ्या पत्रकार परिषदेमध़्ये याविषयी भाष्य केलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
नागपूर महापालिकेत एकूण आरक्षणाचा आकडा 54.30 टक्के असून, चंद्रपूर महापालिकेत हा आकडा 53 टक्के इतका आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांच्या आरक्षण नको असं बजावलं असून, परिणामी वरील दोन्ही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. ज्यामुळं फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका घेतल्या जाण्याची प्राथमिक शक्यता आहे. आरक्षण कमी करण्याबाबत राज्य शासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्यानं आता या दोन निवडणुकांचं भविष्य काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चंद्रपूरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत. ज्यामुळं सध्या राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगात मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यायालयीन आदेशांनुसार जानेवारीच्या अखेरपर्यंत स्थआनिक स्वराज्य संस्थांच्या निवणूक प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित असून, त्यात 50 टक्के आरक्षण मर्यादेची अटही पाळली जावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्यामुळं निवडणूक आयोगाकडून आता या दोन महापालिकांना नेमका कोणचा कौल दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.