'शत्रू...'; राजकारणी कार्यकर्त्याला गृहित धरतात? विचारताच मनपा निवडणुकीआधी सुप्रिया सुळेंचं लक्षवेधी वक्तव्य

Pune Municipal Corporation Election : नेतेमंडळींसाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि नेत्यांमध्ये असणाऱ्या नातेसंबंधांवर काय म्हणल्या सुप्रिया सुळे?   

सायली पाटील | Updated: Jan 9, 2026, 01:47 PM IST
'शत्रू...'; राजकारणी कार्यकर्त्याला गृहित धरतात? विचारताच मनपा निवडणुकीआधी सुप्रिया सुळेंचं लक्षवेधी वक्तव्य
Maharashtra Municipal Corporation Election to the point exclusive Supriya Sule ncp sp on political relationships and local party worker struggle

Pune Municipal Corporation Election : काही दिवसांवरच महानगरपालिकांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना सध्या सुरू असणाऱ्या प्रचार प्रक्रियेमध्ये नेत्यांपेक्षा जास्त जीवाचं रान हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. मात्र वस्तुस्थिती पाहिती असता, चित्र काहीसं वेगळं दिसतं. याच मुद्द्याला अनुसरून झी 24तासचे संपादक कमलेश सुतार यांनी राष्ट्रवादी SP पक्षाच्या (Supriya Sule) खासदार सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारला. 

Add Zee News as a Preferred Source

'राजकीय संस्कृतीच्या नावावर, नेत्यांनी एकमेकांना भेटायचं, कार्यकर्ते मात्र एकमेकांशी झगडणार, डोकी फोडणार. राजकीय संस्कृतं हे गोंडस नाव असून प्रत्यक्षात मात्र राजकारणी कार्यकर्त्याला गृहित धरतात?'

धमक्यांची ही संस्कृती...

नेत्यांमधील सलोखा आणि कार्यकर्त्यांमध्ये तळागाळाशी होणारा संघर्ष यावरी प्रश्नाचं उत्तर देताना असं चित्र सगळीकडे नसतं असं ठाम मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं. 'आमचा कार्यकर्ता हा सुसंस्कृत आहे. हवंतर तुम्ही माझ्या गाव, वाडी, वस्तीत गेलात तर सगळे एकमेकांच्या सुख-दु:खाला जातात. असं नाही, की आम्ही फक्त लोकप्रतिनिधी जातो आणि आमचं सर्वांशी जमतं आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष असतो. मुळात ही नवी संस्कृती महाराष्ट्रात कधीच नव्हती, धमक्यांची ही संस्कृती आता आली', असं सुळे म्हणाल्या. 

सध्या केली जाणारी द्वेषाची भाषा आपल्यालाही अस्वस्थ करते

जेव्हा लग्नकार्य असतं, तेव्हा गावातला प्रत्येक माणूस जातो, अगदी सरपंच विरोधात असता तरीही जातो असं सांगताना हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे असं त्यांनी लक्षात आणून देत नेत्यांमध्ये सलोखा आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष असं चित्र आमच्या इथे नसल्याचं सुळे म्हणाल्या. 'सध्या केली जाणारी द्वेषाची भाषा आपल्यालाही अस्वस्थ करते. अनेकदा सोशल मीडियावर पातळी सोडून हल्ला होतो, हा द्वेष कशामुळे आहे याचा विचार व्हायला पाहिजे. सोशल मीडिया नव्हतं तेव्हा इतका द्वेष नव्हता. समाजातच काहीतरी गोष्टी चुकतायत. एक काळ होता, पोलिसाला आपणही सलाम करायचो आज त्याच पोलिसाला गाडी थांबवली तर जाऊन  कॉलर धरली जाते, हे आत्मचिंतन आम्हीही राज्यकर्ते म्हणून आपल्याकडूनही होणं अपेक्षित असल्याचं म्हणत राजकारणाला मिळालेल्या रोषपूर्ण वळणावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

हेसुद्धा वाचा : Pune Municipal Corporation Election : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती घाट्याची? उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अस्वस्थ...'

स्वत:चं नातं असणं आणि राजकीय मतभेद असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हीच तर गल्लत होतेय. माझं म्हणणं आहे की राजकीय मतभेद हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजेत. मात्र याचा अर्थ एकमेकांची डोकी फोडणं असा नाही आणि मुळात काँग्रेसची ही संस्कृतीच नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 'ही राज्यात आलेली नवी संस्कृती असून, आधीच्या काळात सभा व्हायच्या, एकमेकांवर टोकाची टीका केली जायची, एक मत असायचं. आता सोशल मीडियावर जो राज दिसतो तो कुठून येतो आणि का येतोय? मतभेद हे असायलाच हवेत, पण म्हणून तुम्ही माझे शत्रू आहात हा संदेश देशात पोहोचणं थांबायला हवं', असाच आग्रही सूर सुप्रिया सुळे यांनी आळवला. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More