आमच्या सोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

Maharashtra Political News :  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या आघाडीबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 28, 2024, 11:55 PM IST
आमच्या सोबत आले तर...  प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर  title=

Prakash Ambedkar on Uddhav Thackeray :  झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या आघाडीबाबत भाष्य केले आहे. आम्ही कोणाकडे जाणार नाही. पण, आम्ही आमचे दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करू अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिलीय. मात्र आम्ही कोणाकडे जाणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआसोबत जाण्याचे  संकेत दिले होते. ठाकरे गटासोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. जर ठाकरे गट मविआत असेल तर आम्हीही मविआचा पर्यायही खुला ठेवला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होते.  प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा देखील झाली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना महाविकासआघाडीत सहभागी करुन घेतले असल्याचे कोणतीही अधिकृत प्रततिक्रिया देण्यात आली नाही. यामुळे ही चर्चा फक्त चर्चाच राहिली. 

लोकसभा निवडणुकीत वंचितचा दारुण पराभव झाला. पराभव स्वीकार करत डॉ. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत....महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलं नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय...वंचित बहुजन आघाडीचा झालेला अपमान आणि महाविकास आघाडीकडून वंचितला मिळालेली संकुचित वागणून हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडल्याचंही आंबेडकर म्हणालेत...त्यांनी यासंदर्भात एक पत्र प्रकाशीत करत त्यांना मविआचा समाचार घेतलाय...