महाराष्ट्राच्या राजकारणातला अनोखा योगायोग, आर.आर पाटील आणि अनिल बाबरांच्या आठवणींना मुलांमुळे मिळाला उजाळा

Unique coincidence: माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर (आबा) पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोघांचीही मैत्रीचे पाऊल विधिमंडळात 1990 मध्ये पडलं होतं.त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्याच सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 7, 2024, 09:29 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातला अनोखा योगायोग, आर.आर पाटील आणि अनिल बाबरांच्या आठवणींना मुलांमुळे मिळाला उजाळा
पाटील आणि बाबर

Unique coincidence: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक विचित्र वळणं पाहायला मिळत असली तर अनेक चांगले योगायोगदेखील पाहायला मिळत आहेत. असाच एक योगायोग अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाला. वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश झाला. रोहित पाटील-सुहास बाबर प्रथमच आमदार बनून अधिवेशनासाठी पोहचले.

Add Zee News as a Preferred Source

माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर (आबा) पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोघांचीही मैत्रीचे पाऊल विधिमंडळात 1990 मध्ये पडलं होतं.त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्याच सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आहे.आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील आणि स्वर्गीय अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही एकाच वेळी नागपूरच्या विधानसभेत अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. 

विशेष म्हणजे हे दोघेही विधानसभेच्या प्रवेशद्वारावरून एकत्र सभागृहापर्यंत पोहोचले.त्यामुळे आर आर आबा आणि अनिल भाऊ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच शिवाय यानिमित्ताने योगायोग देखील पाहायला मिळाला. 

आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर या दोघांचाही आर आर आबा आणि अनिल भाऊंप्रमाणे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.1990 मध्ये स्वर्गीय आर आर आबा पाटील तासगाव मतदार संघातुन निवडून आले होते. त्याच बरोबर खानापूर मतदारसंघातून आबांचेच मित्र असणारे अनिल बाबर हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते.या दोघांनीही एकत्रित आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता.

योगायोगाने आता आबांचे सुपुत्र रोहित आर आर पाटील आणि अनिल भाऊंचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत,आणि वडिलांप्रमाणेच योगायोगाने हे दोघेही नागपूरच्या विधानसभा अधिवेशनासाठी एकत्रित दाखल झालेत.त्यामुळे वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश घडल्याचा अनोखा योगायोग घडून आलाय. आणि वडिलांप्रमाणेच मुलांनी देखील एकत्रित पहिल्यांदाच आमदार म्हणून केलेल्या विधानसभेतील प्रवेशाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More