Most Shoking Result Expected From This Constituency: पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या जुन्नर मतदारसंघामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दमदार लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र या मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. या मतदारसंघामधून पहिल्या सात फेऱ्यांमधील मतमोजणीनंतर अपक्ष उमेदवार तब्बल 8538 मतांनी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार पूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राहिला आहे.


पवारांचा उमेदवार जिंकेल असं वाटलेलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतमोजणीमध्येही शरद पवारांच्या उमेदवाराने आघाडी घेतली. मात्र फेरी संपेपर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांनी घाडी घेतली. पहिल्या फेरीनंतर शरद पवारांच्या पक्षाचे शेरकर हे 1392 मतांनी पिछाडीवर राहिले. या फेरीत लांडेंनी 4859 मतांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत अतुल बेनके पिछाडीवर होते. अतुल बेनके पहिल्या फेरीत 1116 मतांनी पिछाडीवर राहिले. पहिल्या फेरीमध्ये शरद सोनावणेंना 1335 मतं पडली. पहिल्या फेरीमध्ये आशा बुचकेंना केवळ 500+ मतं मिळाली.
जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर आघाडीवर


मोठी आघाडी


मात्र पहिल्या दोन तासांमधील मतमोजणीनंतर सात फेऱ्यांमधील मतं मोजली गेली. यामध्ये अनपेक्षितरित्य शरद सोनवणे 8538 मतांनी आघाडीवर आहेत. एकूण 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. नऊ फेऱ्यांमध्ये शरद सोनावणेंना 31852 मतं मिळाली असून त्यांच्याकडे 8399 मतांची आघाडी आहे. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिला तर राज्यातील या मतदारसंघातून सर्वात धक्कादायक निकाल लागू शकतो असं सांगितलं जात आहे.



शरद सोनावणे रिक्षा या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले होते. विशेष म्हणजे अतुल बेनकेंविरोधात अपक्ष अर्ज दाखल केल्याने एकनाथ शिंदेंच्या सेनेने त्यांची काही दिवसांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली होती. 



कोण आहेत शरद सोनावणे?


शरद सोनावणे हे मूळचे शिवसेनेचे होते. मात्र तिकीट नाकारल्याने ते 2014 साली मनसेच्या तिकीटावरुन जुन्नरमधून निवडणूक लढले आणि जिंकले होते. त्यावेळेस ते राज्यातील मनसेचे एकमेव आमदार होते. मात्र नंतर त्यांना संधी देण्यात आली नाही. ते 2019 पासून सत्तेबाहेर होते. त्यांनी शिवसेनेमधील पक्षफुटीनंतर शिदेंच्या पक्षाची साथ दिली. मात्र उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना अतुल बेनकेंना उमेदवारी दिल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. शरद सोनावणे यांचा येथे दांडगा जनसंपर्क आहे. तसेच आमदार असताना केलेली कामंही त्यांची जमेची बाजू असून याच जोरावर त्यांना भरघोस मतदान झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.