Maharashtra vidhan sabha election results : राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी मारलीय. राज्यात 128 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरल्याच पाहिला मिळतंय. हाती आलेल्या कौलनुसार भाजप 128, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 53 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर आहे. महायुतीने 217 ही मॅजिक फिगर गाठली असून आताचा कौल महायुतीच्या बाजुने असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत. (Maharashtra vidhan sabha election results Mahayuti reached the magic figure Praveen Darekar told the reason for the victory of Mahayuti)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीच्या विजयाचं कारण भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. त्यांनी राज्यातील लाडकी बहिणींना विजयाचे श्रेय देत त्यांचे आभार मानलं आहेत. पहिला कौल हातात आल्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि संजय राऊत रडीचा डाव खेळत असल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केलीय. लोकशाहीमध्ये पराभव पण मोठ्या मनाने स्विकारला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिली. 



विधानसभा निवडणुकीचे आकडे जसे समोर येत आहे, त्यानंतर संजय राऊत म्हणाले काही तरी गडबड आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी विचारलं असता 'संजय राऊत यांना पागलाच्या दवाखान्यात दाखल करावं लागणार आहे', अशी टीका केली. 'आता तरी त्यांनी हवेत उडताना आकाशातून खाली यावं. महाराष्ट्रांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही, विकासावर बोलायचं नाही. नुसतं शिव्या, मस्तर, द्वेष आणि टीका करत सुटायचं. मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत जी काही चूक केली जे काही झालं होतं ते दुरुस्त करुन ती खंत मनात होती. मोदी साहेबांना पाठबळ द्याला आम्ही कमी पडलो. ते यश महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिलंय.'