महाराष्ट्रातील फायरब्रॅंड लढत! शेवटच्या क्षणी पक्ष बदलून मंदा म्हात्रेंविरोधात लढणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा पराभव
Maharashtra Politics : नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपनं पुन्हा एकदा मंदा म्हात्रेंना संध्याने नाराज झालेल्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने बंडखोरी करत निवडणूक लढवलीय तरीही मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : महाराष्ट्रातील फायरब्रॅंड लढत नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघात पहायाला मिळाली. भाजपने तिकीट नाकारल्याने भाजपच्या एका बड्य़ा नेत्याच्या मुलाने शेवटच्या क्षणी पक्ष बदलून बंडखोरी केली. भाजपच्या उमेदवार मंत्रा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणून लढवली. मात्र, सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.
नवी मुंबईतल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत झाली. फायरब्रँड नेत्या मंदा म्हात्रेंना पुन्हा एकदा तिकीट देऊन भाजपनं बेलापूरातून मैदानात उतरवलंय. भाजपनं पुन्हा एकदा मंदा म्हात्रेंना संधी दिल्याने संदीप नाईक नाराज झाले. भाजपला रामराम ठोकून संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
मंदा म्हात्रे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बेलापूरमध्ये बंडाची ठिणगी पडली. इच्छुक असलेल्या संदीप नाईकांनी भाजपला रामराम करून तुतारी हाती घेतली. तब्बल 25 नगरसेवकांना घेऊन संदीप नाईकांनी तुतारी हाती घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली. संदीप नाईकांनी भाजपकडे बेलापूरमधून उमेदवारी मागितली होती. भाजपनं गणेश नाईकांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र बेलापूरमधून मंदा म्हात्रेंना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज संदीप नाईकांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. बेलापूर विधानसभा मतदार संघताून मंदा म्हात्रे 415 मतांनी विजयी झाल्या आहेत.