थेट इशारा! थंडीचं आणखी धडकी भरवणारं पर्व सुरू; महाराष्ट्रासह देशभरातील हवामानात कसे बदल होणार?

IMD Maharashtra Weather Alert 21 January 2026: मागील 3 ते 4 दिवस देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, ही थंडी इतक्यात पाठ सोडणार नाही असं चित्र स्पष्ट दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 21, 2026, 07:26 AM IST
थेट इशारा! थंडीचं आणखी धडकी भरवणारं पर्व सुरू; महाराष्ट्रासह देशभरातील हवामानात कसे बदल होणार?
Maharashtra Weather News 21 january 2026 tempreture hike predictions cold wave in north india cloudy weather in maharashtra konkan mumbai thane pune palghar climate

IMD Weather Alert 21 January 2026: दिल्लीसोबतच संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या थंडीचा कडाका वाढत असून, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. मात्र पुढील 48 तासांमध्ये हवामानात मोठे बदल होणार असून, केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काळात पाऊस आणि हिमवर्षावाचं पर्व सुरू होणार आहे. देशाच्या उत्तरेकडे होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमालयावर पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं 21 जानेवारीला पर्वतीय राज्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. ज्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये प्रामुख्यानं मोठे बदल अपेक्षित आहेत. तर, जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टीस्तान, लडाख आणि हिमाचल प्रदेशातील अतीव उंचीवर असणाऱ्या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागांमध्येही पावसाचा इशारा असून याचा थेट परिणाम मध्य भारतापर्यंत दिसण्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रात वाढणार थंडीचा कडाका... (Maharashtra Weather News)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांसह त्यानंतरही काही दिवस राज्यात तापमानातील घट सुरूच राहणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यात थंडीसोबतच वातावरण अंशत: ढगाळ असेल. तर, पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर धुक्याचं चित्र पाहायला मिळेल. मराठवाड्यात प्रामुख्यानं हवामान कोरडं असेल. तर, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम इथं जास्त दिसून येईल. 

विदर्भातही मराठवाड्याप्रमाणंच हवामानाची स्थिती कायम राहणार असून तापमानात होणारी घट सुरूच राहणार आहे. ज्यामुळं पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात चढ - उतार पाहायला मिळणार असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा तर दुपारच्या वेळी तीव्र सूर्यप्रकाशामुळं जाणवणारा उकाडा अशीच एकंदर स्थिती पाहायला मिळणार आहे. 

केंद्रीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य प्रदेश, ओडिशामध्ये ढगाळ वातावरण, पंजाब हरियाणामध्ये धुक्याची स्थिती, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, तर पूर्वोत्तर भारतात धुकं नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकणार आहे. देशभरात प्रामुख्यानं उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, 22- 23 जानेवारीदरम्यान पश्चिमी झंझावात अधिक प्रमाणात सक्रिय असेल. ज्यामुळं पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानी भागांमध्ये थंडीचा कडाका सातत्यानं वाढत जाण्याचं चित्र असून थंडीचा हा कडाका येत्या दिवसात वाढणार असल्याचा इशारा आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More