)
Maharashtra Weather News : शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सायंकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरही इथं अपवाद ठरलं नाही. अशा या मान्सूनेत्तर पावसानं सध्या राज्यातील मुक्काम वाढवला असून, एकिकडे उष्मा वाढत असता तरीही दुसरीकडे मात्र पावसासाठी पोषक वातावरणनिर्मितीसुद्धा होताना दिसत आहे.
सोलापूर शहरात शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. ज्यामुळं शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. शहरातील अवंती नगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळे सोलापूर, तुळजापूर रोड या भागात नागरी वस्तीत पाणी साचायला सुरुवातही झाल्याचं दिसून आलं. महिन्याभरापूर्वी सोलापूर शहरात अशाच पद्धतीने पाऊस झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते, त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाली आणि पुन्हा तत्सम स्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या दक्षिण भारासहर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वारे वाहणार असून मेघगर्जनेसह कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाज्याच्या काही दुर्गम भागांमध्येही मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पुढील 48 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इथं वाऱ्यांच्या तीव्रता आणि दिशेत होणाऱ्या हवामान बदलांमुळे काही भागातही पावसाची शक्यता आहे. तर, 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरींची अपेक्षा आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रातातील कमी दाबाच्या पट्यामुळं त्याचा थेट परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसामध्ये दिसून येत आहे.
25 ऑक्टोबर : अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर
26 ऑक्टोबर : मुंबई, नाशिक,अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
27 ऑक्टोबर : धुळे, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर
28 ऑक्टोबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी
24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय होती?
महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सायंकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांसह राज्यातील बहुतांश भाग प्रभावित झाले. हे मान्सून संपल्यावर येणारा पाऊस असून, तो राज्यात काही दिवस राहण्याची शक्यता आहे. एकीकडे उष्णता वाढत असली तरी पावसासाठी अनुकूल हवामान तयार होत आहे.
सोलापूर शहरात पावसामुळे काय परिणाम झाले?
सोलापूर शहरात शुक्रवारी रात्री अतिवृष्टीसदृश मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे सखल भागात पाणी साचले. अवंती नगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळे सोलापूर आणि तुळजापूर रोड यासारख्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय आहे?
हवामान विभागानुसार, दक्षिण भाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. मेघगर्जनेसह कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल.