Maharashtra Weather News : देशात सध्या हिवाळा ऋतू सुरू असला तरीही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मात्र हवामानाचे विचित्र तालरंग पाहायला मिळत आहेत. सध्या उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, शुक्रवार (5 डिसेंबर 2025) पंजाबच्या अदमपूर इथं मैदानी भागात देशातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. जिथं पारा 2 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर कर्नाटकातील होनावर इथं देशातील उच्चांकी अर्थात 35.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात मात्र सध्या आलेली थंडीची लाट काही अंशी ओसरताना दिसत आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये किमान तापमानात वाढ झाल्यामुळं थंडीची लाट ओसरून गारठा काहीसा कमी झाला आहे. पहाटेची वेळ यास अपवाद ठरत असून, यादरम्यान मात्र गारठा जाणवत आहे. मात्र आकाश निरभ्र होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत असल्याचं लक्षात येत आहे. आठवड्याचा शेवट तुलनेनं कमी गारठ्यानं होणार असला तरीही पुढच्या 48 तासांमध्ये मात्र किमान तापमानात पुन्हा एकदा हळूहळू घट होत गारठा वाढण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
प्रत्यक्षात गारठा कमीजास्त होत असला तरीही सातारा, कोल्हापूर, पुणे येथील घाटमाथ्यांवर धुक्याची धुक्याची दुलई आणि गुलाबी थंडीचा हलका स्पर्श जाणवत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून, धुळे आणि निफाड इथं अनुक्रमे 8.6 अंश आणि 9.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून, सूर्य मावळतीला जात असताना बहुतांश भागांमध्ये आभाळात निसर्गाचा एक वेगळाच चमक्तार पाहता येईल. दिखं विविध रंगांच्या छटांनी आभाळ व्यापून जाईल आणि थंडीच्या या दिवसांमध्ये निसर्गाचं हे वेगळं रुप पाहता येईल. समुद्रावर तयार होणारे वारे, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडे तयार होणारा कमी दाबाचा पट्टा पाहता या साऱ्याचा एकत्रित परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसणार आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.