चक्रीवादळाच्या 'शक्ती'चा महाराष्ट्राला धोका? पुढील 24 तासांत हवामानात नेमके कोणते बदल अपेक्षित?

Maharashtra Weather News : राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार? मराठवाड्यामागोमाग कोणत्या भागांना इशारा? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...  

सायली पाटील | Updated: Oct 6, 2025, 06:43 AM IST
चक्रीवादळाच्या 'शक्ती'चा महाराष्ट्राला धोका? पुढील 24 तासांत हवामानात नेमके कोणते बदल अपेक्षित?
Maharashtra weather News 6 oct 2025 Rain updates latest predictions konkna marathwada mumbai vidarbha

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान पाहायला मिळत असून पुढच्या 24 तासांसाठी राज्याच्या कोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याबाबतची संक्षिप्त माहिती हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून देण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. ज्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

कोकणापासून मराठवाड्यापर्यंत कसं असेल पर्जन्यमान? 

कोकण विभागात येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची हजेरी असेल तर, मध्य महाराष्ट्रात जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार इथं वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल. पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि सोलापुरातही पावसाच्या हलच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होणार असली तरीही हलक्या तरी नाकारता येत नाहीत. तर, विदर्भात मात्र भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र पावसाचा जोर फारसा नसेल. सध्या राज्यात कधी पाऊस तर कधी ऊन असं वातावरण राहील तर, पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात वाढ अपेक्षित आहे. 

मुंबईत कसे असतील पावसाचे तालरंग? 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात होईल. काही भागांमध्ये पाऊस उघडीप देऊन सूर्यकिरणांची हजेरी असेल तर काही भागांमध्ये मात्र क्षणात काळेकुट्ट ढग दाटून येत पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे. 

कुठवर पोहोचलं शक्ती चक्रीवादळ? 

अखेरच्या निरीक्षणानुसार रविवारपर्यंत चक्रीवादळ पश्चिम-मध्य अरबी समुद्रात जाणार पुढे सरकून सोमवारी सकाळी पूर्व-ईशान्येस सरकत कमकुवत होत जाणार आहे. याचा थेट धोका महाराष्ट्राला नसला तरीही दरम्यानच्या काळात मासेमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या वादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नसला तरीही पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे ही बाब नाकारता येत नाही. 

FAQ

महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे?
महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण असमान आहे. पुढील 24 तासांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह (30-40 किमी/तास वेग) पावसाची शक्यता आहे. 

कोणत्या भागांसाठी पावसाच्या सतर्कतेचा इशारा आहे?
कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कोकण विभागात पावसाची शक्यता काय?
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More