Maharashtra weather news : देशभरात सध्या कडाक्याच्या थंडीचं पर्व सुरू असतानाच मैदानी क्षेत्रांपासून ते पर्वतीय भागांमध्ये पारा घसरताना दिसत आहे. हिमालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या बहुतांश राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं स्थानिकांसह पर्यटकांच्याही अडचणीत भर पडताना दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हवामानाला अनुसरून उत्तरेकडील या राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार पुढील काही दिवसांसाठी देशाच्या उत्तर पश्चिमेकडे दाट धुक्याची चादर अडचणी वाढवताना दिसेल. तर, अनेक राज्यांमध्ये शीत दिवसांची नोंद केली जाऊ शकते.
देशाच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. ज्यामध्ये राज्यात गारठा आणखी वाढणार असून, त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा सर्वाधिक प्रभावित होताना दिसेल असा प्राथमिक अंदाज आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवेलय. कोकण, ठाणे, पालघर, रायगड इथं पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा असेल, तर दिवसा मात्र सूर्याचा दाह सोसेनासा होईल.
राज्यात प्रामुख्यानं पुणे, नाशिक, भंडारा, गोंदिया, निफाड, परभणी इथं पारा 10 अंशांच्याही खाली येईल. तर, घाटमाथ्यावर धुक्याची चादर पाहायला मिळेल. राज्यातील किमान तामानात 2 अंशांची वाढ अपेक्षित असली तरीही गारठा मात्र कायमच जाणवणार आहे. राज्यात कुठंही पावसाचा इशारा नसला तरीही ढगाळ वातावरण मात्र दमट वातावरणाला चालना देईल. ज्याचा परिणाम मुंबई शहर आणि कोकणातील काही भागांमध्ये दिसून येईल. जिथं आकाश अंशत: ढगाळ राहणार असून संभाव्य सरासरी तापमान कमाल आणि किमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस, 18 अंश सेल्सिअस इतकं असेल.
बंगालच्या उपसागरामध्ये आग्नेयेस विषुववृत्ताजवळ वादळी प्रणाली तयार होत असून, वाऱ्यांची ही प्रणाली श्रीलंकेपासून 410 किमी, तामिळनाडूच्या कराईकलपासून 810 किमी, चेन्नईपासून 980 किमीवर वायव्येस पुढे सरकत असून ती श्रीलंकेतील हंबनटोटा आणि कालमुनाई इथं धडकण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या प्राथमिक अंदाजानुसार उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगढ़, झारखंड, ओडिशा इथं थंडीचा कडाका वाढण्यासमवेत धुक्यामुळं अडचणी वाढताना दिसतील.
देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर मात्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्यामुळं हवामानात अनपेक्षित बदल होत 9 आणि 10 जानेवारीला तामिळनाडूमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्याच आला आहे. तर, 10 जानेवारीला केरळमध्येही पावसाचा इशारा असल्यानं हे पेचात पाडणारं हवामान असल्याचच म्हटलं जात आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.