राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा चांगलाच वाढला असून, विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 18, 2025, 07:19 AM IST
राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय?
Maharashtra Weather news, Maharashtra Weather, Maharashtra Weather updates, Weather forecast, Maharashtra, Mumbai Wearther, Mumbai, winter, temprature, Cold wave, winter vibes, Mumbai, Maharashtra, Konkan, Vidarbha, marathwada, Maharashtra Weather updates

Maharashtra Weather News : होलिकादहनानंतरही देशभरात तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहेत. अद्यापही उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असून ही संपूर्ण स्थिती पश्चिमी झंझावाताच परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणास्तव पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसानं शिडकावा केला असून, इथं महाराष्ट्रातही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वारे पाहता राज्यात काही अंशी दमट हवामान पाहायला मिळू शकतं. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करायचा झाल्यास इथं राज्यभरात उन्हाचा तडाखा कायम राहील. तर, काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असेल. राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळं जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशी शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 

राज्यावर एकिकडे उन्हाळ्यातच पावसाचं सावट असतानाच दुसरीकडे विदर्भ आणि तिथं सोलापूरात पारा उच्चांकी पातळीवरही पोहोचला आहे. बहुतांश भागांमध्ये तापमान चाळीशीपलिकडे गेल्यानं बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं उन्हाचा दाह वाढत असतानाच मधूनच येणारं पावसाळी ढगांचं सावटही नागरिकांना राज्यात अनुभवता येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : 18 मार्च 2025 पासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद; स्थानिकांनी का घेतला हा इतका मोठा निर्णय?

 

मुंबईत कोरड्या वाऱ्यांची सरशी 

पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण कोरडं राहणार असून, किमान तापमान 26 ते 27 अंशांदरम्यान राहू शकतं. तर, दुपारी तापमानाचा पारा कमाल 36 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. इथं दाह मात्र 38 अंशांइतका असल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. ज्यामुळं मुंबईकरांनी उकाड्यापासून इतक्यात सुटका नाही हेच आता स्पष्ट होत आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More