तूफान आलंया! 130 वर्षांत झालं नाही ते गेल्या दोन दिवसात घडलं; हवामानाचं हे रुप आणखी धडकी भरवणार, पुढचे 24 तास...

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या उन्हाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत असून, याचा सर्वाधिक फटका शेतपिकांना बसताना दिसत आहे. ही स्थिती आणखी किती दिवस कायम राहणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त....   

सायली पाटील | Updated: Apr 3, 2026, 08:26 AM IST
तूफान आलंया!  130 वर्षांत झालं नाही ते गेल्या दोन दिवसात घडलं; हवामानाचं हे रुप आणखी धडकी भरवणार, पुढचे 24 तास...
Maharashtra weather news today 3 april unseasonal rain hailstorm alert pune konkan marathwada mumbai humid climate predictions

Maharashtra Weather News : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यातच गारपिटीचा तडाखासुद्धा हवामानाबाबत चिंता वाढवून जात आहे. ही परिस्थिती इतक्यात सुधारणार नसून, पुढील काही दिवस तरी हा उन्हाळी पाऊस राज्यात मुक्कामी असेल असाच अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तिथं पुण्यात झालेल्या पावसानं 130 वर्षांचा विक्रम मोडला आहे. ज्यामुळं ऋतूचक्रामध्ये झालेला हा बदल हवामानाच्या दृष्टीकोनातून चिंतेत भर टाकताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पुण्यात विक्रमी पावसाची नोंद (Pune Weather News)

पुणे जिल्ह्याला गेले दोन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, 82 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. वारजे, रविवार पेठ, पाटील प्लाझा, सॅलिसबरी पार्क परिसरात नागरिकांची तारांबळ उडाली. याचदरम्यान पुण्यात पावसाने 130 वर्षांचा एप्रिल महिन्यातील विक्रम मोडत या महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.  गुरुवारी दुपारी दोन ते चार वाजता शिवाजीनगर इथं 65 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी परिसरात 84 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आणि 130 वर्षाचा विक्रम मोडला आहे. गुरुवाकी सलग दोन तास झालेल्या पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरात अनेक रस्ते जलमय झाले होते. 

फक्त पाऊस नव्हे तर एकिकडे उष्मा, दमट हवा, तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट आणि पावसाची हजेरी असं हवामान राज्यात पाहायला मिळत आहे. 3 ते 5 एप्रिलदरम्यान देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावाताचा प्रभाव आणखी तीव्र होणार असून, त्यामुळं अनेक राज्यांना एप्रिल महिन्यात पावसाचा तडाखा बसताना दिसेल असा प्राथमिक अंदाज आहे. 

हेसुद्धा वाचा : इराणवरील हल्ल्यापूर्वी अमेरिकेत मोठी खळबळ; अमेरिकेच्या लष्करप्रमुखांना हटवलं, तर संरक्षणमंत्र्यांना सक्तीची निवृत्त

 

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये पावसाची हजेरी असेल तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात काहीशी घट नोंदवली जात असून, मुंबईतही असंच चित्र आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसांनंतर हवामानाच्या या स्थितीत बदल होण्यास सुरुवात होईल, जिथं कमासल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. 

पावसासाठी पूरक स्थिती कशी निर्माण होतेय? 

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार तीव्र पश्चिमी झंझावात भारतीय उपखंडाच्या दिशेनं पुढे येत असून, पुढील तीन दिवस भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पाहायला मिळेल. सध्या वाऱ्याची ही स्थिती अरबी समुद्राच्या उत्तरेला असून, भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागात शुक्रवारपासून त्याचा प्रभाव तीव्र झाल्याचं पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं राज्यातही वादळी पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत आहे. तर देशात पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्येही पावसाचं सावट आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More