Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सध्या भयानक वातावरण आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा बसत आहे. तर, दुसरीकडे राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन उन्हाळ्यात धो धो पाऊस पडत आहे. यामुळे अनेक जिल्ह्य़ांमध्ये नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
जालन्यातील भोकरदन तालुक्यात आज मुसळधार पाऊस झाला आहे. भोकरदन मधील सोयगाव देवी झालेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आलं आहे. उन्हाळयात कोरड्या पडलेल्या नद्यांना देखील पूर आला आहे. या मुसळधार पावसामुळे नागरीकांना चांगलाच दिलासा मिळाला असून शेतीकामांना आता सुरुवात होणार आहे.
बीड जिल्ह्यात सकाळपासूनच हवामानातील आद्रता वाढली होती. दुपारी अचानक ढग आले आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सुरुवातील वारे अत्यंत्य वेगाने वाहू लागले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागातील झाडे तुटून पडली आहेत. तर, विद्युत तारे देखील तुटल्या आहेत. दरम्यान शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे 22,361 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये झाले आहे. 10 हजार 636 हेक्टरवर पिके भुईसपाट झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जळगाव जिल्हा आहे. जळगावमध्ये 454 हेक्टरवर नुकसान नाची नोंद झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. या जिल्ह्यात 3500 हेक्टरचे नुकसान झाले आहे. कांदा पिकासह उडीद मूग डाळी, ज्वारी, मका भुईमुगच मोठे नुकसान झाले आहे.
यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.