प्रविण ताडेकर, झी मीडिया, भंडारा : पहिल्या पत्नीला न सांगता नवरा दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतो. पण ऐनवेळी लग्न मंडपात नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या बायकोची एन्ट्री होते आणि... कोणत्या तरी चित्रपटाचा सिन वाटतोय ना? पण हा कोणत्या चित्रपटाचा सीन नाही तर अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे (Extramarital Affair). भंडारा (Bhandara) येथील एक तरुणाचा  दुसऱ्याला लग्नाचा डाव त्याच्या पहिल्या बायकोने उधळून लावला आहे. कल्याण (kalyan) येथे हा लग्न सोहळा सुरु होता. दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या नवरदेवाची लग्न मंडपातून थेट पोलिस ठाण्यात रवानगी झाली आहे (Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरी पत्नी व मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात होता.  नवरा दुसरा लग्न करतोय हे समजताच पहिली बायको मुंबईच्या लग्नमंडपात आली. लग्नच्या विधी सुरुच होणार होत्या इतक्यात पहिल्या बायकोने लग्नमंडपात पोलिसांना घेऊन एन्ट्री केली. पोलिसांना पाहून लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. 


खेमराज बाबुराव मुल ( वय 40 वर्षे) असं दुसऱ्या लग्नाच्या थाड घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. खेमराज हा मुळचा भंडारा येथील मासळ, तालुका लाखांदूर येथील आहे. खेमराज हा पेंटचा व्यवसाय करतो. 15 वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून गावातीलच मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. काही दिवस पत्नीसोबत गोडीगुलाबीने राहिला. त्यांना मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात बेबनाव सुरू झाला. पत्नीविरोधात घटस्फोटाची केस न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात असतानाच दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु केली. 


पत्नीला नवरा दुसरा लग्न करत असल्याी कुणकुण लागली. तिने सर्व माहिती काढली आणि तिला लग्नाची तारीख देखील समजली. यानंतर  तिने नवऱ्याच्या लग्न  डाव उधळण्याचा निर्णय घेतला. तिने मुलाला सोबत घेऊन मुंबईची वाट धरली.  कल्याण (पूर्व) येथील दर्शन मॅरेज हॉलमध्ये तिच्या नवऱ्याचा दुसरा लग्न सोहळा सुरु होता.  मुलगा, भाऊ, बहिणी आणि इतर नातेवाईकांना घेऊन थेट लग्न मंडपात पोहचली. वर  आणि वधू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असताना पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने लग्नाचा डाव उधळला. 


पोलिसांना सोबत घेूनच ती लग्न मंडपात आली होती. घटस्फोट झाला नसताना दुसरं लग्न करणाऱ्या खेमराज मुल यांना  पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध कल्याणमधील (मुंबई) कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भादंवि 494, 511, 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक लग्नात घडलेला हा फिल्मी किस्सा पाहून लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी आश्चर्यचकित झाले.