मुलीने प्रियकराचा नाद सोडावा म्हणून बापाने अख्ख्या गावाला वेठीस धरले, मंतरलेल्या विटा...

Maharashtra Crime News: एकाने मंतरलेल्या विटा विहिरीत टाकल्या त्यामुळं संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली

मानसी क्षीरसागर | Updated: May 13, 2025, 07:16 AM IST
मुलीने प्रियकराचा नाद सोडावा म्हणून बापाने अख्ख्या गावाला वेठीस धरले, मंतरलेल्या विटा...
man throw brick in well over his daughter affair in alibaug

Maharashtra Crime News: अलिबाग येथील रेवदंडा गावात एक भलताच प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी वडिलांनी जे काही केलं ते पाहून संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. मुलीला अद्दल शिकवण्यासाठी बापाने संपूर्ण गावाला वेठीस ठेवले. रेवंदडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. 

अखलाक खान असं मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांच्या मुलीचे एका मुलासोबत अफेअर होते. मुलीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी त्यांनी मांत्रिकाची मदत घेतली. मौलाना खलील यांनी जादूटोणा करुन तावीज बांधलेल्या विटा दिल्या. त्यानंतर अखलाक यांनी रविवारी रेवदंडा येथून रिक्षाने साळाव ते रोहा रस्त्यावरील ताडगावमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विटा टाकल्या. 

स्थानिकांनी या विटा पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  यामुळं स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असता. विहिरीत पाणी दूषित करण्याच्या उद्देशाने वीट टाकल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करताच खान याला अटक केली आहे. तसंच, मौलाना खलीद यालादेखील अटक करण्यात आली आहे. विहिरीतील पाण्याची तपासणीदेखील करण्यात येणार आहे. खानकडून कच्च्या मातीची आयताकृती वीटही जप्त करण्यात आली आहे. 

जुन्या वादातुन एकाची हत्या

गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कारंजा गावात भर दिवसा चार लोकांनी दोन तलवारीने 45 वर्षीय महेंद्र मदारकर यांची हत्या केली. मृतक हे कारंजा गावातील रहिवाशी असून जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने महेंद्र याचा पाठलाग करून त्यांच्या राहत्या घरा पासून काही अंतरावर घर काम सुरू असलेल्या ठीकाणी बांधकाम सुरु असलेल्या कॉलम खड्ड्यात डोक्यावर तलवारीने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी घटना स्थळा वरून पसार झाले. याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृत देह ताब्यात घेतला आहे.