)
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये आरक्षणावरून सुरू असलेला वाद आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचला आहे. कारण जरांगेंनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केला आहे. भुजबळांनी अजित पवारांविरोधात षडयंत्र रचलं आहे. अजित पवारांना संपवण्याचा घाट
भुजबळांनी घातल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. तर भुजबळांनी देखील जरांगेंवर पलटवार केला आहे.
जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमधला वाद आता शिगेला पोहोचला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी मोठा गौप्यस्फोट करत ओबीसी नेते छगन भुजबळांवर गंभीर आरोप
केला आहे. भुजबळांनी अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला आहे, तसंच भुजबळांच्या साथीला परळीवाले असल्याचं म्हणत जरांगेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर देखील आघात केला आहे. जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भुजबळांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे
भुजबळ दादांविरोधात षडयंत्र रचताय, परळीवालेही सहभागी
अजित पवारांना कोणीही संपवू शकत नाही, जरांगेंवर पलटवार
छगन भुजबळ आणि जरांगे पाटलांमधला संघर्ष जुनाच आहे. मराठा आरक्षणाची मागणी झाल्यापासून भुजबळ-जरांगेंमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे. नाशिकमध्ये भुजबळ
आणि वडेट्टीवारांमध्ये गुप्त बैठक झाल्याचा दावाही जरांगेंनी केलाय. या बैठकीमध्ये अजित पवार आणि फडणवीसांविरोधात डाव रचल्याचा आरोपही यावेळी जरांगेंनी भुजबळ-वडेट्टीवारांवर
केला आहे.
भुजबळ-वडेट्टीवारांमध्ये बैठक, फडणवीस-दादांविरोधात डाव
वडेट्टीवारांना मी उघडपणे भेटू शकतो, जरांगे येईल ते बोलतो
ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवारही चांगलेच आक्रमक झाले आहेत. वडेट्टीवारांनी रविवारी जरांगेंवर चांगलीच आगपाखड केली, दरम्यान यानंतर जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार भुजबळांचं ऐकून वक्तव्य करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. दरम्यान जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर भुजबळांनी देखील जरांगेंना खोचक टोला लगावला आहे.
येवल्यावाला, परळीवाल्याला नवा भिडू भेटलाय, ते दंगली भडकवणार
वाळू चोर आणि दारूचे धंदे करणारे लोकांचा जरांगे नेता, अभ्यास नाही
जरांगेंनी भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या आरोपांना भुजबळांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी वडेट्टीवारांवर देखील निशाणा साधलाय. मात्र, यानंतर वडेट्टीवारांनीही आक्रमक भूमिका घेत जरांगेंवर संतप्त प्रतिक्रिया दिलीय...
काय करेल तो मारून टाकणार, तेव्हा जरांगेला फाशीवर चढवा
छगन भुजबळांचं ऐकून स्वत:ला संपवू नका, जरांगेंचा पलटवार
जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केलीय. मात्र, यानंतर जरांगेंनी देखील 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआर आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, आरक्षणावरून सुरू असलेला हा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आरक्षणावरून सुरू झालेल्या या लढाईला चांगली हवा भेटली असून या नेत्यांमधला वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे..