Dhananjay Munde Resignation: बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली आहे. हे फोटो समोर आल्यानंतर 24 तासांच्या आत या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळचे संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला. मंगळवारच्या या राजीनामा नाट्यानंतर विरोधक नरमतील अशी सरकारला अपेक्षा होती. मात्र सभागृहामध्ये आधी या विषयावरुन नंतर समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमींनी औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानावरुन गदारोळ होऊन कामकाज बंद झालं. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा चर्चेत असला तरी आता थेट त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी पुण्यातील मराठा समाज बांधवांनी केली आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी मराठा समाज आग्रही असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यासह धनंजय मुंडे यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी अशा मागणीचं निवेदन मराठा समाजाने दिलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देत पुण्यातील सकलक मराठा समाजाने मुंडेंची आणदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे
संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर मंगळवारी बीडच्या बंद नंतर आज धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन देखील देण्यात आल आहे. धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा, कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करा व संतोष देशमुख यांच्या खुनातील सर्व आरोपींना फाशीचे शिक्षा द्या या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. आज दुपारी धाराशिव शहरात निषेध रॅली देखील काढण्यात येणार आहे.
बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फक्त राजीनामा नको तर धनंजय मुंडेला सहआरोपी करण्याची मागणी करत रोष व्यक्त करण्यात आला. बार्शी तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळात कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
PHI
(20 ov) 201/9
|
VS |
MAS
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.