महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये मोठी दुर्घटना; शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले

माथेरानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.   शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jun 15, 2025, 07:20 PM IST
 महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये मोठी दुर्घटना;  शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले

Matheran Tourist Places :  पुण्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली असताना माथेरानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. माथेरानच्या शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पर्यटनस्थळी फिरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

इको पाईंट, मंकी पाईंट, लायन्स पाईंट असे अनेक पाईंट माथेरानमध्ये  आहेत. यापैकीच एक आहे ते शॉर्लोट तलाव हा पाईंट. अनेक पर्यटक तलावाजवळ फोटो काढतात तसेच पोहण्याचा आनंद लुटतात. याच  शॉर्लोट तलावात तीन पर्यटक बुडाले आहेत.  तिघेही पर्यटक नवी मुंबई येथील असल्‍याची माहिती आहे. 

सुमित चव्‍हाण (16), आर्यन खोब्रागडे (19) आणि फिरोज शेख (19) अशी बुडालेल्‍या पर्यटकांची नावे आहेत. 10 जण पाण्‍यात पोहण्‍यासाठी उतरले होते त्‍यापैकी तिघेजण बुडाल्‍याची माहिती मिळते आहे. सह्याद्री सेस्‍क्‍यू टीम आणि पोलिस यंत्रणा त्‍या ठिकाणी बचाव कार्य करीत आहे. अन्‍य बचाव पथकेदेखील घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्याचा अंदज न आल्याने हे सर्वजण तलावात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, 

पावसाळ्यामुळे माथेरानमध्ये  पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामुळे माथेरानमधील हॉटेल्स, लॉज आणि इतर पर्यटन स्थळे पूर्णपणे भरली आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील होत आहे.. माथेरानमध्ये विकेंडसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दस्तुरीपासून चांगभल मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही पहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल होत असून प्रवाशांचा प्रचंड संताप होत आहे. पर्यटक वाहने रस्त्यात सोडून माथेरानकडे चालत जात आहेत.