मोठी बातमी! दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींना भेट; तिसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या खातात आले का?
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : नवरात्री आणि दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल चेक करा, कारण या महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या टप्प्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नवरात्री आणि दसऱ्यापूर्वी सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलंय. रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. आता नवरात्री आणि दसऱ्यापूर्वीच महिलांच्या खात्यात मानधन जमा झाले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची नवरात्री, दसरा आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
दसरा - दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींना भेट, 'या' महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा
आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावर तिसऱ्या टप्प्याबाबत सविस्तर माहिती दिलीय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38 लाख 98 हजार 705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याच त्यांनी सांगितलंय. शिवाय उर्वरित महिलांना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र भगिनींना महिन्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता, त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आलंय, असे आदिती कटकरेंनी जाहीर केलंय.
रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्र 3000 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आलंय. मात्र अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिले होते. पण आता ज्या महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर केलेली आहे, अशा महिलांना तीन हप्त्याचे एकूण 4500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे या महिलांची दसरा दिवाळी अतिशय जोरात असणार आहे. तर ज्या महिलांनी 1 सप्टेंबरपासून अर्ज केलंय त्यांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत.