Melghat Crime: गर्भवती महिलेची घर, समाजाकडूनही काळजी घेतली जाते. आशा वर्करही यामध्ये महिलांना मदत करत असतात. पण आशा वर्करच गर्भवती महिलेच्या जीवावर उठत असेल तर? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका किरकोळ वादातून आशा वर्करने गर्भवती महिलेवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय.
घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्कर आणि गर्भवती महिलेचा वाद झाला. यानंतर संतप्त आशा वर्करने गर्भवती महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर जबर मारहाण केली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रकार इतका धक्कादायक होता की या मारहाणीत गर्भवती महिलेचे दातही पाडले आहे.
अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील ही घटना आहे. या घटनेनंतर गर्भवती महिलेसह तिच्या पतीलाही लाकडी काठीने जोरदार मारहाण करण्यात आली. या घटनेत गर्भवती महिलेचा पतीदेखील गंभीर जखमी झाला. गर्भवती महिलेवर आणि तिच्या जखमी पतीवर चूरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिखलदरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर चिखलदरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. मात्र गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त असलेल्या आशा वर्कर कडूनच गर्भवती महिलांना अशा प्रकारची मारहाण होत असेल तर मेळघाट्यातील आदिवासी महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यात एक अंगावर शहरे आणणारी घटना घडली आहे. बहिणीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच भावाने आईला हाताशी घेत तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील चंद नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या भावाने आई आणि मित्रासह तिच्या प्रियकराला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या बॉयफ्रेंडची आणि तिच्या भावात खून्नस होती. वर्षभरापासून आरोपीच्या डोक्यात हा राग होता. याच रागातून त्याने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. पुण्यातील चंदन नगर परिसरातील गुरुवारी रात्री साडे ११ दरम्यानची घटना घडली आहे. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. प्रदीप अडागळे असं मृत तरुणाचे नाव आहे तर ऋषी काकडे असं आरोपीचे नाव आहे.प्रदीप अडागळे हा ऋषी काकडे यांच्या बहिणीचा बॉयफ्रेंड होता. वर्षभरापासून दोघांमध्ये खुन्नस होती. बहिणीला त्रास का देतो म्हणत कायम दोघामध्ये वादावादी व्हायची. काल रात्री साडे अकराच्या सुमारास दोघे चंदननगर परिसरात असलेल्या भाजी मंडीमध्ये ऋषी काकडे त्यांची आई सविता आणि मित्र शुभम मांढरे याने प्रदीपला थेट फरशीने मारहाण केली. यात प्रदीप गंभीर जखमी झाला होता. रात्रीच प्रदीपला ससूनला उपचारासाठी नेण्यात आल होत. मात्र आज सकाळी साडे सहा दरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला आहे.