MHADA Lottery: हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र मुंबई व मुंबई लगतच्या शहरात घराचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे परवडत नाही. म्हणूनच नागरिक म्हाडा किंवा सिडकोच्या योजनांची वाट पाहत असतात. अलीकडेच म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन हजार घरांची लॉटरी काढली होती. त्यानंतर आता कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या लॉटरी काढण्यात आली होती. या घरांच्या सोडतीला अखेर 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. 25 डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या सोडतीची अर्ज विक्री प्रक्रिया मंगळवारी संपुष्टात येत असून अर्ज विक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २,२६४ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ ४९८९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर अर्ज विक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदवाढीनुसार आता 10 डिसेंबरऐवजी 25 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.


कोकण मंडळाकडून २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 728, 15 टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेल्या ११७ घरे अशा एकूण २,२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत मंगळवारी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. असे असताना सोमवारपर्यंत (९ डिसेंबर) २,२६४ घरांसाठी १३ हजार २४९ जणांनी अर्ज भरले आहेत. तर यातील केवल ४,९८९ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. त्यामुळं  मंडळाने अर्ज विक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 


26 डिसेंबर 2024 रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करु शकणार आहेत. तसंच, 26 डिसेंबर 2024 रोजी RTGS/NEFTच्या माध्यमातून अनामत रकमेचा भरणा अर्जदाराना करता येणार आहे. तसंच, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांचा सोडतीचा निकाल मोबाइल एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळणार आहे. https://lottery.mhada.gov.in