Toll Plaza Attack: चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर शहराजवळील टोल नाक्यावर दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पिकअप वाहनाने टोल टाळण्यासाठी चक्क कर्मचाऱ्याच्या अंगावरच गाडी घातली आहे. या घटनेत संजय वांढरे नावाचा 34 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यातील चंद्रपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात हत्येचा प्रयत्नअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी घटनेनंतर घटनास्थळावरुन फरार झाला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले होते. स्थानिक प्रशासन आणि टोल प्रशासनाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच, त्या पिकअप चालकाला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार CCTVच्या आधारे पोलिस आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच, लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
संजय वांढरे हे बल्लारपूर शहरातील गांधी वॉर्ड परिसराचे रहिवासी असून ते टोल नाक्यावर कार्यरत होते. एक पिकअप वाहन टोल न भरता टोल नाका वाचवत पळण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी संजय वांढरे यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी थांबवण्याऐवजी त्यांच्या अंगावर गाडी घातली. हा सर्व घटनाक्रम व्हिडिओत कैद झाला आहे.
महाराष्ट्र के चंद्रपुर जिले में एक मिनी ट्रक चालक ने टोल टैक्स बचाने के लिए टोल प्लाजा के कर्मचारी को कुचल दिया। सीसीटीवी में कैद हुई घटना pic.twitter.com/sZwgSvAmii
— Rahul (@rahuljuly14) June 9, 2025
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वळसंगजवळील कर्जाळयेथील उभ्या असलेल्या ट्रकला बसनी धडक दिली आहे. भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स बसने ट्रकला धडक दिल्यामुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनला जात असताना झाला अपघात.