घोडबंदरच्या ट्रॅफिकला वैतागलेल्या नागरिकांसाठी Good News! मीरा-भाईंदर, ठाण्यात सुरू होणार गेमचेंजर प्रकल्प

मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनाकडून अनेक प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे.त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे पॉड टॅक्सी. मुंबईत लवकरच पॉड टॅक्सीच प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांतही पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून डीपीआर बनवण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 15, 2025, 01:14 PM IST
घोडबंदरच्या ट्रॅफिकला वैतागलेल्या नागरिकांसाठी Good News! मीरा-भाईंदर, ठाण्यात सुरू होणार गेमचेंजर प्रकल्प
Mira Bhayandar and Thane-Ghodbunder To Also Get Pod Taxi

Mumbai Pod Taxi: मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनाकडून अनेक प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे.त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे पॉड टॅक्सी. मुंबईत लवकरच पॉड टॅक्सीच प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांतही पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून डीपीआर बनवण्यात येणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मीरा-भाईंदर आणि ठाण्यात घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतुककोंडी होते. त्यामुळंच हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महामुंबईकरांचा वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे सोपवली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उन्नत पॉडकार वाहतूक सेवा ही भविष्यातील पर्याय ठरू शकते. 

मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरात 18 ठिकाणी पॉड टॅक्सी उभारणीसाठी एमएमआरडीएकडून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पॉड टॅक्सी ही कमी जागेत उभारली जाणारी व्यवस्था आहे. त्यानुसार या पॉडकारमध्ये 20 प्रवासी बसू शकतात. तसंच, ताशी 60 ते 70 किमी वेगाने धावू शकते. ऑनबोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीवर ही यंत्रणा चालते. 

FAQ

प्रश्न १: मुंबई पॉड टॅक्सी प्रकल्प काय आहे?

उत्तर: मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला जात आहे. हा प्रकल्प मुंबईसह मीरा-भाईंदर आणि ठाणे शहरांतही राबवला जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून डीपीआर (सविस्तर अहवाल) तयार करण्यात येत आहे.

प्रश्न २: हा प्रकल्प कोणत्या भागांत राबवला जाणार आहे?

उत्तर: मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरात घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने हा प्रकल्प येथे उभारला जाणार आहे. मुंबईकरांसह या भागातील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल.

प्रश्न ३: पॉड टॅक्सी प्रकल्पाची जबाबदारी कोणाकडे आहे?

उत्तर: परिवहन विभागाने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) कडे सोपवली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उन्नत पॉडकार वाहतूक सेवा भविष्यातील पर्याय ठरेल.प्रश्न ४: मीरा-भाईंदर आणि ठाण्यात किती ठिकाणी पॉड टॅक्सी उभारली जाणार आहे?

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More