Pratap Sarnaik vs Narendra Mehta: मिरा भाईंदरमध्ये निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना व भाजपची युती फिस्कटल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात चांगलीच जुंपत असलेली पाहायला मिळत आहे. माझ्या शेपटीला तुम्ही आग लावली आहे, आता मी रावणाची लंका जाळून राहणार असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानंतर नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना मी पणा असून ते घमंडी असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मीरा-भाईंदरमध्ये शिंदेंची शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक युतीसाठी इच्छूक होते, मात्र, नरेंद्र मेहतांचा युतीच्या विरोधात होते. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत एकत्र लढणार आहेत. मात्र, दुसरीकडे बाजूच्याच मीरा-भाईंदर पालिकेत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
भाईंदरमध्ये भाजपला मानणारा मोठा वर्ग, 88 जागांवर लढतोय असं नरेंद्र मेहता म्हणाले आहेत. तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहतांमध्ये घमंड, त्यामुळे भाजप-शिवसेनेची युती तुटली असं म्हटलं आहे. 2017 मध्ये झालेला पालिका निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, भाजपनं सर्वाधिक जागा जिंकत विरोधकांना धूळ चार ऐतिहासिक विजय मिळवला होता.
प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे की, "मीरा भाईंदमध्ये युती झाली नाही ते एका दृष्टीने बरं झालं. मीरा भाईंदरचा भारतीय जनता पक्ष हा नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा आहे. मेहुणी महापौर असताना मेहतांनी पालिकेत मोठा भ्रष्टाचार केला. मेहता हे सर्वात मोठे भूमाफिया आहेत. बलात्कार, दमदाटी व भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली. माझ्या शेपटीला तुम्ही आग लावली आहे, आता मी रावणाची लंका जाळून राहणार. 15 तारखेनंतर मुख्यमंत्र्यांकडे मेहतांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणार".
यावर नरेंद्र मेहतांनी उत्तर देत सांगितलं आहे की, "सरनाईक हे स्वतः मोठे भूमाफिया व भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत. मीरा-भाईंदरमध्ये 80 कोटींची जमीन 3 कोटी रुपयांत खरेदी केली. नागरिकांसाठी असलेल्या जागेत सरनाईकानी स्वतः आपले दुकान थाटले. त्यांचे कारनामे लपले पाहिजेत, म्हणून त्यांनी युतीचा प्रस्ताव आणला".
मुख्यमंत्र्यांकडे सरनाईक तक्रार करणार आहेत यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "ईडी कार्यालयात सरनाईकांचीच योजना सुरू आहे. निवडणुकीनंतर कशाला त्यांनी आताच तक्रार करावी. देवाने सरनाईकांना सद्बुद्धी द्यावी , ही प्रार्थना. प्रताप सरनाईकांना मीपणा असून ते घमंडी आहेत".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.