Raj Thackeray on Election Commission: राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुबार मतदारांवरुन दिलेल्या उत्तरामुळे राज ठाकरेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आता 100 टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
"आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल असं आवाहन त्यांनी केलं आहे.
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
पत्रकार परिषदेदरम्यान आयुक्तांनी सुलभ शौचालय आणि आयुक्तांच्या घराच्या नावे असणाऱ्या यादीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांनी, 'मतदारयादीची यंत्रणा वेगळी आहे' असं उत्तर दिलं. "आम्ही फक्त ती यादी स्विकारतो. आम्ही एक तारीख ठरवतो आणि त्यादिवशी ती स्विकारतो. दुबार, चुकीचा प्रभाग, विधानसभा यादीच नाव आहे पण इथे नाही ते समाविष्ट करतो". एकूणच आयुक्त उत्तर देताना गोंधळलेले दिसले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत - 21 नोव्हेंबर
मतदान - 2 डिसेंबर
मतमोजणी - 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल - 10 डिसेंबर
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू असली तरी काही निर्णय, कार्यक्रम जर येथील मतदारांवर प्रभाव करणारे असतील तर तेदेखील आचारसंहितेमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे.
कोकण - 27
नाशिक - 49
पुणे - 60
छत्रपती संभाजीनगर - 52
अमरावती - 45
नागपूर - 55
FAQ
1) नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतदान तारीख काय आहे?
मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होईल.
2) मतमोजणी आणि निकाल कधी जाहीर होईल?
मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होईल आणि निकाल त्याच दिवशी जाहीर होतील.
3) मतदारांसाठी कोणत्या विशेष सुविधा आहेत?
मतदारांना मतदान केंद्र शोधणे, मतदार यादीत नाव तपासणे आणि उमेदवारांची माहिती पाहण्यासाठी विशेष मोबाईल अॅप लाँच केले जाईल.
स्त्री मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'पिंक बूथ' स्थापन केले जातील, जे महिला कर्मचारी आणि पोलिसांकडून चालवले जातील.
निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या ६६,७७५ पेक्षा जास्त असेल.
मतदार जागृती मोहिमा पारंपरिक आणि नवीन माध्यमांद्वारे चालवल्या जातील
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.