Raj Thackeray Speech: ठाकरेंची पोरं इंग्रजीत शिकली म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी 'ती' यादीच वाचली; म्हणाले, 'मंत्रिमंडळातील मंत्र्याचं...'

Raj Thackeray Slams CM Devendra Fadnavis: हिंदीची सक्ती मागे घेतल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या विधानावरुन राज ठाकरेंनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2025, 03:25 PM IST
Raj Thackeray Speech: ठाकरेंची पोरं इंग्रजीत शिकली म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी 'ती' यादीच वाचली; म्हणाले, 'मंत्रिमंडळातील मंत्र्याचं...'
राज ठाकरेंनी थेट यादीच वाचून दाखवली

Raj Thackeray Slams CM Devendra Fadnavis: मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या कुटुंबातील मुलं इंग्रजीमध्ये शिकली अशी टीका करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.  हिंदीच्या सक्तीवरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना हिंदी भाषेसंदर्भातील शासन आदेश मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी ठाकरेंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकली यावरुन टोला लगावताना ठाकरेंची मुलं इंग्रजीतून शिकली असं म्हटलं होतं. याच टीकेला राज ठाकरेंनी एक यादी वाचून दाखवत आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

कुठे काय शिकला याचा काय संबंध? 

"काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. आता माघार घेतली ना मग वेगळ्या ठिकाणी वळवा प्रकरण! ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडीयममध्ये शिकली, बरं शिकली मग पुढे काय?" असा सवाल राज यांनी विचारला. पुढे बोलताना, "दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकला याचा काय संबंध?" असा प्रश्नही मनसे अध्यक्षांनी विचारला. 

नक्की वाचा >> 'औकात आहे का?', राज-उद्धव यांना स्वामी आनंद स्वरूपांचं आव्हान; 'मी मुंबईत येतोय, हिंमत असेल तर समोर येऊन..'

अडणवाणींच्या हिंदुत्वावर शंका घेणार का?

"अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली. यांची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली मग यांना मराठीचा पुळका कसा? सन्माननिय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला.  "लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का. अडणवाणी कॉनव्हेंट स्कूलमध्ये शिकलेत," असं राज म्हणाले. 

नक्की पाहा हे फोटो >> 3103 कोटींचा मालक आहे राज ठाकरेंना नडणारा Sushil Kedia; त्याचा नेमका उद्योग काय? एवढी संपत्ती कशी कमवली?

यादीच वाचून दाखवली

"दक्षिण भारतात तमीळ, तेळगुच्या प्रश्नावर कडवटपणे उभे राहतात. तिथे कोणी विचारत नाही तुमची मुलं कोणत्या भाषेत शिकली. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल, मराठीचा अभिमान बाळगेन काही अडचण आहे का?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला. राज यांनी दक्षिणेमधील इंग्रजी भाषेत शिकलेल्या मान्यवरांची यादीच वाचून दाखवली. "दक्षिणेतले इंग्रजीत शिकलेले नेते आणि अभिनेते कोणते हे सांगतो," असं म्हणत राज यांनी जय ललिता, स्टॅलिन, कन्निमोळी, उदयनिधी, चंद्रबाबू नायडू, पवन कल्याण, नारा लोकेश (एनटीआरचा नातू), कमल हसन, अभिनेता विक्रम, अभिनेता सूर्या, ए. आर. रेहमान यांचा उल्लेख करत त्यांच्या शाळा कोणत्या होत्या हे नावासहीत सांगितलं. 

ए. आर. रेहमानचा किस्सा

पुढे राज ठाकरेंनी ए. आर. रेहमानबद्दलचा एक किस्सा सांगितला. "रेहमान स्टेजवर असताना त्या बाई कानडीमध्ये बोलत होता. त्या बाई अचानक हिंदीत बोलू लागल्या. ए. आर. रेहमानने त्यांच्याकडे पाहिलं म्हटलं हिंदी. ए. आर. रेहमान खाली स्टेजवरुन खाली उतरले. तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तो आत असावा लागतो," असं राज म्हणाले. 

नक्की वाचा >> राज ठाकरे- उद्धव ठाकरेंमध्ये वयाचं अंतर किती? यावर आकडेवारीवर तुमचा विश्वास बसणं कठीण

संरक्षण दलाचं दिलं उदाहरण

"बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले ते इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्र काढयाचे. पण मराठी अभिमानाबद्दल कधी त्यांनी तडजोड केली नाही," अशी आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. "एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते. कोणती भाषा. आजपर्यंत काय वाकडं झालं?" असा सवाल करताना राज यांनी भारतीय संरक्षण दलामधील लष्कराची दलं कोणती आहेत ते वाचून दाखवलं. यामध्ये राज यांनी, "आपल्या संरक्षण खात्यात जेवढ्या रेजिमंट आहेत त्यात मद्रास, राजपूत, राजपुताना रायफल्स, डोंगरा, शिख, जाट, पॅराशूट, पंजाब, मराठा इन्फेन्ट्री, गडवाल, आसाम, बिहार, महार, जम्मू-कश्मीर, गुरखा, गुरखा रायफल्स, सिक्कीम रायफल्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. देशात प्रांतवार रचना झाली कारण तसे भाग होते. मग या गोष्टी कशासाठी आणि का सुरु केल्या. महाराष्ट्रातील मराठी माणूस मराठी म्हणून एकत्र आला," असं म्हटलं.

फक्त महाराष्ट्रात विचारतात

"कोणाकोणाची मुलं परदेशात शिकतात याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार? त्यातल्या त्यात मंत्रिमंडळातील मंत्र्याचं हिंदी ऐका फेफरं येईल," असं राज यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.  "कोणीची मुलं कुठे शिकली हे असेल प्रश्न फक्त महाराष्ट्रात विचारले जातात," असा टोलाही राज यांनी लगावला. 

जातीचं कार्ड खेळतील

"याचं पुढचं राजकारण तुम्हाला पुन्हा जातीत विभागण्यास सुरुवात करतील. पुन्हा जातीचं कार्ड खेळतील. तुम्हाला मराठी म्हणून एकत्र येऊ देणार नाहीत. जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील," असं राज ठाकरे म्हणाले.